नळदुर्ग प्रतिनीधी
बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी शेती केली तरच शेतकऱ्याला तारणार आहे .कारण आज बदलत्या हवामानाचा मानवी शरीरावर, मनावर परिणाम होत असून याचा अनिष्ट परिणाम शेतीवर ही होताना दिसत आहे .हवामान बदलामुळे अनेक मोठी पिके धोक्यात येत आहेत. हवामान बदलाची कारणे व परिणाम याबाबत माहिती देताना राहुल मध्ये बोलत होते शहापूर ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद येथे आज दि. 1/8/2023 रोजी अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसार अभियानांतर्गत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते .पुढे बोलताना राहुल मते म्हणाले जागतिक स्तरावर पृथ्वीच्या वातावरणात नैसर्गिक व मानवनिर्मित कारणामुळे हरितगृह वायूची वृद्धी व तापमानात वाढ होऊन त्याचे परिणाम पाऊसमान व सृष्टीतील जीवनमानावर होताना दिसत आहे .त्याला हवामान बदल असे म्हणतात. पाऊस ,आर्द्रता, सूर्यप्रकाश ,वारा आणि तापमान हे हवामान बदल निश्चित करणारे घटक आहेत. हवामान बदलामुळे अनियमित अवकाळी पाऊस सरासरी तापमानात वाढ ,घट अति थंडी, धुके, गारपीट, वादळ, नद्यांच्या प्रवाहात घट बर्फ वितळणे पूर चक्रीवादळ दुष्काळ इत्यादी परिणाम दिसतात 19 व्या शतकापासून पृथ्वीच्या तापमानात हळूहळू वाढ झालेली दिसते .अलीकडच्या काळात हवामान बदलाचे परिणाम तीव्रतेने जाणवत आहेत यावर मात करायचे असेल तर शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन हवामानानुकूल शेती करणे गरजेचे आहे. कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारायचे असेल तर अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसाराचा उपयोग करून आपण शेती केली पाहिजे असे ते म्हणाले. प्रारंभी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी प्रास्ताविक केले व अफार्म पुणे, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यातील चार गावात या विषयावर काम चालू आहे या कामाची माहिती दिली . याच कार्यक्रमांमध्ये तृणधान्य प्रोत्साहन अभियानांतर्गत ही शेतकऱ्यांना बी बियाण्याचे किट वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शेतकरी ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा कार्यकर्ते नानासाहेब पाटील होते. या कार्यक्रमात बचत गटातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .शहापूर गावांमध्ये गेल्या वर्षापासून अल्पकर्तिक शाश्वत शेती पद्धती बाबत परिवर्तन सामाजिक संस्था जनजागृती चे काम करीत आहे. या कामास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले आहे याबाबत मारुती बनसोडे यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
