आदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रेरणा कदम राज्यात द्वितीय तर अजिंक्य रहाणे १७ वा
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने कौतुक व अभिनंदण
देशभक्त न्युज - बीड / -
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत व आदित्य शिक्षण संस्था मर्यादित बीड येथील आदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रेरणा कदम हिने MCAER PG CET Exam 2023 मध्ये राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे तर अजिंक्य रहाणे याने १७ वा क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे . सदरील परीक्षा पदवी पश्चात कृषी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी घेतली जाते. या यशाबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्रजी सारडा, संचालिका डॉ. आदितीजी सारडा, महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल सानप, प्राचार्य श्याम भुतडा, प्रशासकीय अधिकारी डॉ. अरुण मुंडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले व त्यांनापुढील शिक्षणासाठी यावेळी शुभेच्या दिल्या.

