तेलंगणावरून परत येताच आ . पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ...!
आमचा पोशिंदा आमच्या व्यथा समजून घेण्यास तात्काळ भेटीस आल्याची शेतकऱ्यांतुन चर्चा
तर शेतकरी वर्गातुन आ . राणाजगजितसिंह पाटलांच्या कामाचे कौतुक व तात्काळ मदतीची मागणी
देशभक्त न्युज - कळंब / -
कळंब तालुक्यातील गोविंदपुर व मोहा येथे सकाळच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व शेतकरी बांधवांना धीर दिला.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काही दिवसांपासून पावसात खंड पडला आहे. त्यामुळे सहाजिकच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहेत.
सदरील परिस्थितीच्या अनुषंगाने पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. चुकीचे पंचनामे होऊ नये यासाठी प्रमुख कार्यकर्ते यांना उपयुक्त सूचना दिल्या आहेत. तसेच पंचनामावर सही करताना शेतकऱ्यांनी देखील खात्री करावी, याबाबत जागृती करण्यात येत आहे. जेणेकरून पुढे मदत मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही.
या भेटीप्रसंगी कृषी व महसूल विभागाचे संबंधित अधिकारी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

