सरकारचा शेतकऱ्यावरील अन्याय सहन करणार नाही. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
भूम तालुक्यातील अनेक गावा - गावातील विविध कार्यक्रमातुन खासदारांचा नागरीकांशी संवाद
देशभक्त न्युज / भुम -
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भूम तालुक्यातील आयोजित अनेक गावां - गावातील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन झंजावती दौरा केला व नागरीकांशी थेट संवाद साधला या दरम्यान कार्यक्रमातुन बोलताना त्यांनी सरकारचा शेतकऱ्यावरील अन्याय सहन करणार नाही अशा शब्दात महाराष्ट्र सरकारचा खरपुस समाचार घेतला यावेळी बोलताना खासदार म्हणाले की , सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात सातत्याने अन्यायकारक भूमिका घेत असल्याचे वारंवार सिध्द झाले आहे. सोयाबीनचे दर तसेच टोमॅटो आयात धोरण कांद्यावरती 40 टक्के पेक्षा जास्त निर्यात कर लादून सरकार शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहे.
“ मी सर्वसामान्य जनतेची व गोरगरिबांची कामे तत्काळ व्हावीत या उद्देशाने लोकांचे फोन कॉल घेऊन कामे केल्याने अनेकांच्या पोटात भितीचा गोळा फिरत आहे. या भिती पोटीच माझी ग्रामपंचायतची निवडणूक लढविण्याची लायकी नसल्याचे विधान केले जाते , पण सन 2009 मध्ये मी लोकाशिर्वादाने विधानसभेचा आमदार होतो, विधानपरीषदेचा नव्हे याचा सविस्तर विसर पडलेला आहे याची आठवणही विरोधकांना त्यांनी करुन दिली. तसेच माझे दिवंगत वडिल यांच्यावर यापुढे कोणी टिका केल्यास त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर दिले जाईल ” असेही त्यांनी यावेळी विरोधकांना ठणकावून इशारा दिला .
आयोजित विविध कार्यक्रमामध्ये भूम येथील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन फलकाचे अनावरण करण्यात आले व एमआयडीसी भागात उभारलेल्या स्वस्त मानस व्यसनमुक्ती केंद्रास त्यांनी भेट देवून नागरिकांशी संवाद साधला . उळूप येथे शिवसेना ,युवासेना व किसान सेना यांच्या नूतन फलकाच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी खासदारांनी गावकऱ्यांची अस्थेवाईक पणे चौकशी केली .वालवड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नूतन फलकाचे अनावरण , पाठसांगवी शिवसेना , युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नूतन फलकाचे अनावरण आणि मुख्य कार्यक्रम असलेल्या पाटसांगवी या ठिकाणी सर्व गावकरी व परिसरातील नागरिकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत नेत्र चिकिस्तक तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप कार्यक्रम , हिवर्डा येथे युवा सेनेच्या नूतन शाखेच्या फलकाचे अनावरण हे सर्व कार्यक्रम खारदारांच्या हस्ते संपन्न करण्यात आले .
तालुक्यातील नागेवाडी या ठिकाणी सर्व गाव साथीच्या आजाराने त्रस्त असल्याने जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदरील गावास भेट देवून तेथील गावकऱ्यांशी संवाद साधून त्या ठिकाणी उपचार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आदी बाबत सर्व माहिती जाणून घेतली. झेंडेवाडी आणि बेलेश्वर येथील श्रावण मासानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून खासदारांनी भाविकांना व गावकऱ्यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या तर ईराचीवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सांगता सोहळ्यास त्यांनी उपस्थिती लावली . खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमास शिवसैनिक ,कार्यकार्त्यांची मोठी उपस्थिती होती . तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसुन येत होता . या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर, शिवसेना तालुकाप्रमुख परांडा मेघराज पाटील,नेत्र रोग तज्ञ बाळासाहेब घेंबाड,विधानसभा समन्वयक दिलीप साळू महाराज,शहर प्रमुख प्रकाश अकरे,महिला आघाडी तालुकाप्रमुख उमाताई रणदिवे,माजी तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, विधानसभा युवा अधिकारी प्रल्हाद अडागळे,युवासेना उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव, युवासेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे,शहर प्रमुख अविनाश जाधव,उपतालुकाप्रमुख रामभाऊ नाईकवाडी, अब्दुल सय्यद,ज्येष्ठ नेते केशव नाना चव्हाण, अविनाश गटकळ, राजाभाऊ नलावडे,रफिक तांबोळी,सुबुगडे काका, नाईकवाडी , शंकर गपाट,सरपंच सदानंद जोगदंड,बाळासाहेब वरळे,हनुमंत सानप, तात्या कांबळे, अमोल अशोक वनवे, आकाशराव शेळके, संभाजी नाईकनवरे, बाबा नाईकदी, सुजित गोरे, सागर मुंडे, महेश मुंडे, अशोक पन्हाळे, शेखर वाघमारे, विजय पन्हाळे, अशोक सपकाळ, जयराम गायकवाड, बंकट देवरे, लिंबराज गपाट, अशोक साळुंखे, प्रमोद भोसले, अशोक माने, चंद्रकांत चव्हाण,जावेद तांबोळी तांबोळी,बळीराम गटकळ,विनोद रेडे,संतोष हराळ यांच्यासह सबंध तालुक्यातील गावकरी शिवसेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक, युवासैनिक आदिंची यावेळी मोठ्या संख्येनी उपस्थिती होती .
