कळंब तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या गावकारभाऱ्यांचे आरक्षण सोडत नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर

देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
कळंब तालुक्यातील ९२ गावच्या ग्रामपंचायतीचे साल सन २०२५ ते २०३० साठीचे सरपंचपद आरक्षण कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात दि . १० जुलै रोजी सकाळी ठिक १० वाजता सुरू करण्यात आला होता यासाठी सर्व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रमुख नागरीकांची या आरक्षण सोडतीसाठी उपस्थिती होती .
सदरील सर्व ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत डब्यात चिठ्या टाकून त्यातील एक एक चिठ्ठी दोन शालेय विद्यार्थींच्या हाताने काढुन त्या च चिठ्या उपस्थित सर्वांना दाखवून नंतर तहसिलदार हेमंत ढोकले यांनी आरक्षणा संदर्भात पूर्वीचे सरपंचपद आणि आत्ता सोडतीत सुटलेले सरपंचपद याविषयी माहिती देवून उपस्थित नागरीकांसमोर सन २०२५ ते ३० साठी चिठ्ठी द्वारे निघालेले आरक्षण जाहीर केले .
यावेळी ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रमास निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार जी . व्ही . भराडीया यांच्यासह कर्मचारी गणेश गपाट , खलील शेख , शंकर पाचभाई . यांची उपस्थिती होती .
कळंब तालुक्यातील ९२ गावच्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहे .
वरील प्रमाणे कळंब तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले .




