जयंत्या , सण ,उत्सव यामध्ये डिजे ब इतर गोष्टीवर अनाहुत खर्च करण्या - पेक्षा ईटकूर येथील "आज्जीचा खाऊ " हा उपक्रम सर्वाना आदर्शदायी ठरावा . पोनि . रवी सानप
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
सध्या महापुरुषांच्या जयंत्या , गणेशोत्सव , इतर सण , उत्सव यामध्ये डिजे सारखे कर्कश वाद्य आणि रंगीबेरंगी अशा रंगाच्या उधळपट्टीवर अनाहुत अशा लाखों रुपयांचा खर्च विविध मंडळाकडुन केला जातो मोठया आवाजामुळे कर्णबधीरपणा , कानाचे आजार ,ऱ्हद्ययावर सहन न होणारा मोठा आवाज यातुन मृत्युला आमंत्रण , रंगामुळे त्वचाचे रोग अशा वेगवेगळ्या आजारांना आपण भला मोठा खर्च करून वयोवृद्ध , तरुण आणि वैयक्तीक जिवन धोक्यात घालण्याचे काम करीत असुन या बाबी टाळणे आपल्या हातात आहेत . त्यासाठी विविध मंडळच्या पदाधिकारी व तरुणानीं महापूरूषांच्या जयंत्या सण , उत्सव साजरे करताना पूूर्वी वाद्याने प्रमाणे साजरे करावेत जेणेकरून आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही सामाजिक सलोखा निर्माण होईल .ईटकूर येथील आझाद क्रांती सेनेचे राष्ट्रीयअध्यक्ष धनंजय भाऊ मोरे ,संघटन प्रमुख श्रेयस मोरे,राष्ट्रीय सचिव,ऋतिक शिंदे, प्रसिद्धीप्रमुख कृष्णा मोरे, यांनी इतर तरुणांना सोबत घेवून जयंती , सण , उत्सव यावर होत असलेल्या आनहूत खर्चाल फाटा देत निराधार ,वयोवृद्ध , अशांसाठी " आज्जीचा खाऊ " हा उपक्रम सुरु केला असुन त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा देत असताना मनोमन आनंद होत असल्याची भावना यावेळी पोनि . सानंप यांनी हा उपक्रम सर्वत्र प्रेरणादायी ठरावा जेणेकरून वयोवृद्ध , निराधार , अनाथांची सेवा आपल्या हातुन घडेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली .
"आज्जीचा खाऊ " म्हणजे वयोवृद्ध , निराधार , अनाथाप्रती अपुलकीचे नाते निर्माण करणारा उपक्रम -
संपादक - लक्ष्मण ( तात्या ) शिंदे - पाटील
साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचे संस्थापक / प्रदेशाध्यक्ष तथा देशभक्त चे संपादक लक्ष्मण (तात्या ) शिंदे - पाटील म्हणाले की , आज आई - वडीलांना त्यांच्या वृद्धपकाळात वाऱ्यावर सोडणारी मंडळी आहेत त्यांची होणारी वयोवृद्ध काळातील हेळसांड , अनाथ , निराधार यांचे विविध प्रश्न त्यांची होणारी अवहेलना यासाठी आझाद क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय मोरे आणि त्यांच्या तरुण तडफदार टिम ने "आज्जीचा खाऊ " म्हणजे वयोवृद्ध , निराधार , अनाथाप्रती अपुलकीचे नाते निर्माण करणारा त्यांचा उपक्रम असुन हा ईटकुरात सुरु करण्याची त्यांना चांगली सदबुद्धी सुचली याचा अभिमान वाटतो याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे अशा शुभेच्छा शिंदे यांनी यावेळी दिल्या .
यावेळी या कार्यक्रमास शिवाजी कसबे, शाहू मोरे, बापू मोरे ,भाग्यवंत मोरे, सचिन शिंदे, श्रीकांत चव्हाण विनोद मोरे, यश चव्हाण, सुखदेव शिंदे , भाऊराव मोरे, कैलास मोरे, अजिनाथ मोरे ,संतराम शिंदे, सागर शिंदे, विश्वनाथ मोरे, द्वारकाबाई मोरे, निलेष शिंदे , विश्वजीत ( पाटील ) शिंदे , माजी ग्राप . सदस्य राहुल रणादिवे , मिलींद रणदिवे , पत्रकार सुधाकर रणादिवे , राजु भैय्या पोपा . सोमनाथ जगताप आदिंचीसह या कार्यक्रमास नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .




