देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
कळंब तालुक्यातील ईटकूर येथील युवक रविकीरण रामेश्वर आडसुळ याचे दि . ७ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि याच दिवशी धाराशिव जिल्हा परिषद आणि कळंब पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत असल्याने नवरदेव घरापासून वाजत गाजत आला व ईटकूर जिल्हा परिषद शाळा केंद्रातील लग्न पहेरावातील कपडे , मंडोळे , घोडा , डोक्यावर छत्री सह गेटवर पोहंचताच मतदार केंद्रावर मतदानासाठी उपस्थित मतदार व सर्व उमेदवार नेतेमंडळी यांच्यामध्ये या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी व लगीन बोहल्यावर चढण्या आधी प्रथम आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या नवरदेव रविकरण याच्याकडे पहात त्याचे कौतुकही केले .
देशभक्तशी बोलताना रविकरण ने केल्या आपल्या भावना व्यक्त
लग्ना सोहळ्या पेक्षा प्रथम लोकशाही बळकट व्हावी व प्रत्येकाला आपल्या मतदानाचे महत्व कळावे आणि मी अधी माझ्या मतदानाचा अधिकार अगोदर बजावणे गरजेचे आहे या हेतुने प्रेरीत होवून लग्ना अगोदर मी मतदान केले असुन आपण निवडत असलेल्या आपल्या लोक प्रतिनिधींनी मतदाराप्रती कोणताही पुढील काळात आवसभाव न ठेवता भविष्यात येथील प्रत्येक व्यक्तींना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सह गावच्या सर्वागिण विकासाला महत्व द्यावे ही अपेक्षा .
जसा लग्नसोहळा कुटुंब परिवार , नातेवाईक यांच्यासाठी आनंदाचा क्षण असतो तसंच मतदान म्हणजे आपल्या देशातील लोकशाही चा मोठा सण असतो यामुळे मी माझ्या बंन्धूच्या विवाह सोहळ्या अधी ज्याप्रमाणे जाणतेराजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अज्ञेचे पालन करताना सुभेदार आणि विश्वासु सहकारी तानाजी मालूसरे " अधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे " त्याप्रमाणे मलाही अधी लोकशीही बळकट करण्यासाठी मदान करणे क्रमप्राप्त वाटले आणि नंतर भावाचे लग्न .....
बंन्धू रविराज कल्याण आडसुळ
नवरदेवाच्या आणि आडसुळ परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे .
