Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ईटकूर जिप . गटाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याने राष्ट्रवादी ( शप ) च्या उमेदवारांना निवडणून द्या - खा . निलेश लंके

 ईटकूर जिप . गटाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याने राष्ट्रवादी ( शप ) च्या उमेदवारांना निवडणून द्या - खा . निलेश लंके

आमचे उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारासारखे गुत्तेदार नसुन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि भान असणारे 

            देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -

धाराशिव जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२६ च्या प्रचार रणधुमाळीचा दि . ०५ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आणि याच दिवशीच्या पूर्व संध्येला ईटकूर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे उमेदवार विठ्ठल रामभाऊ माने व ईटकूर पंचायत समिती गणाचे उमेदवार आत्माराम लक्ष्मण बिक्कड यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांच्या सभेचे आयोजन विठ्ठल रुक्मीणी मंदिर परिसरात करण्यात आले होते .

यावेळी मतदारांना संबोधित करताना खा . लंके म्हणाले की , ईटकूर जिप गट आणि पंस गणाची ही निवडणूक  धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याने राष्ट्रवादी ( शप ) च्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडणून द्या .आमचे उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारासारखे गुत्तेदार नसुन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत .

या सभेत ग्रामीण विकास, शेतकरी हित, दर्जेदार शिक्षण, मजबूत आरोग्य व्यवस्था, युवकांना रोजगाराच्या संधी व महिलांचे सक्षमीकरण या मुद्द्यांवर ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिका मांडण्यात आली. जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणारे, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.  परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभव, प्रामाणिकपणा आणि लोकविश्वास या बळावर ही आघाडी सक्षम पर्याय ठरणार असल्याचा विश्वास या सभेतून अधिक व्यक्त करण्यात आला . या सभेला मतदार जनतेची मोठी गर्दी होती . 

या प्रचार सभेसाठी व्यासपिठावर काँग्रेस आय पक्षाचे कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, माजी . जिप . सदस्य अच्युतराव बावळे, ईटकूर ग्राप . उपसरपंच विलास आप्पा गाडे, अरुण अण्णा बावळे, शेकापचे नेते बाबुराव देटे, नेते अरुण आप्पा वेदपाठक, बाळासाहेब कथले, जयचंद नाना वायसे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .

ईटकूरातील काँग्रेस आय पक्षाच्या नेत्यांनी पक्षाची दगाफटका केला काँग्रेस पक्ष त्यांच्यावर लवकरच कडक कारवाई करणार आहे . त्यांनी जी ईटकूर जिप गटात शिवसेना (उबाठ ) पक्षासोबत घरोबा केलाय तशी काँग्रेस पक्षाची चा निवडणूकीत शिवसेना ( उबाठा ) सोबत युती नाही येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप ) उमेदवारांना मतदान करावे  - पांडुरंग कुंभार 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.