आंम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आ . राणा पाटील अंगावर आलात तर शिंगावर घेऊ - आ.प्रा. डॉ. सावंत
आई तुळजाभवानीच्या भक्तांना ड्रग्जच्या पुड्या दिल्या जातील ! असा उपरोधात्मक टोला
जिल्हा परिषदेवर सेनेचा भगवा फडकविणार आ . सावंतांचा मेळावा सभेतून एल्गार .....
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
कुणाची घमेंड असेल की सत्ता माझी आहे. तर सत्ता माझी देखील आहे, मुख्यमंत्री माझा आहे, त्या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही रक्ताचे शिवसैनिक व बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक आहोत. त्यामुळे यापुढे इथे कुणाचीही डाळ शिजू दिली जाणार नाही. त्यामुळे आमच्या अंगावर येण्याचे धाडस करू नका. जर अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असे ओपन चॅलेंज आ.प्रा.डॉ तानाजीराव सावंत यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांना दिले. विशेष म्हणजे तुळजापूरच्या जनतेने ड्रग्ज पेडलरला नगराध्यक्ष केले आहे. त्यामुळे आई तुळजा भवानीच्या भक्तांना प्रसाद म्हणून ड्रगच्या पुड्या दिल्या जातील असा घनाघाती चौफेर हल्ला त्यांनी दि.५ जानेवारी रोजी चढविला.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलित तेरणा शेतकरी सहकारी कारखाना स्थळावर शिवसेनेचा विजयी संकल्प व शिवसेना, शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश साळुंके, जिल्हा संघटक सुधीर पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन केशवराव सावंत, तालुकाप्रमुख अजित लाकाळ, नगराध्यक्ष संजय गाढवे, अजित खोत, ऍड धनंजय धाबेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप, तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, युवासेना कळंब तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, नगराध्यक्ष संजय गाढवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आ प्रा डॉ सावंत म्हणाले की, आपण नवरात्र उत्सवामध्ये आई तुळजाभवानीचे पावित्र्य जपतो. त्यामुळे मी पालकमंत्री असताना दोन वर्ष तुळजाभवानी मातेच्या मंदिर विकास संदर्भातील फाईल टेबलवर होती. फक्त तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याला धक्का लागणार नाही व पवित्र ला ठेच लागणार नाही असा त्यामध्ये बदल करण्याचे सांगितले. परंतू प्रशासनाने तो बदल नसल्यामुळे मी त्यावर सही केली नाही. मात्र सत्ता बदलताच गुलाल उधळून आठ दिवसात ती फाईल मंजूर करुन मंदिरातील पावित्र्य नष्ट करण्याचे पाप केले आहे. त्याची फळे चांगली किंवा वाईट दिल्याशिवाय परमेश्वर राहणार नसल्याचे सांगत इतकी विटंबना देवालाही मान्य नसल्याचे त्यांनी सुनावले. रझाकारासारखा नंगानाच सुरू असून तुम्ही कशाला भिता असे सांगत आ. राणा पाटील यांच्या माध्यमातून तुमच्यावर कुठलेही संकट येऊ द्या हा तानाजी सावंत छातीचा कोट करून तुमच्या पुढे असेल. मला देखील त्यांचे बघायचे आहे, त्यांच्यात किती दम आणि किती गट्स आहेत ते बघायचे असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी खोट्या केसेस करून विरोधकांना आठ टाकता असे सांगत पत्रकारास कोणाच्या फोनवरून अटक केली आहे ? असा प्रहार ही त्यांनी केला. तसेच जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ द्या हा तानाजी सावंत काय आहे हे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचा दमही त्यांनी दिला. तसेच जिल्हा बँक व जिल्हा दूध संघ व सहकारी संस्था यांनी विकून खाल्ल्या. सहकारी साखर कारखाने भंगारत काढले. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून त्या कारखान्यांना पुन्हा गतवैभव देण्याचा प्रयत्न केला असून मी फक्त निमित्त मात्र आहे. जिल्हा बँकेवर कधी प्रशासन बसेल सांगता येत नाही. विकास कसा असतो व कसा करायला पाहिजे हे मी करून दाखवले आहे कालच्या अतिवृष्टी मध्ये सगळ्यात जास्त पाऊस बोंब परांडा वाशी या भागात पडला महापूर आले, १५-१५ दिवस पाण्याला ओसर मिळाला नाही. मी २०१५-१६ ला शिवजलक्रांतीच्या माध्यमातून एक हजार किलो मीटर खोलीकरण केले. ती लोक सांगतात जर तुम्ही ती कामे केली नसती तर गावेच्या गावे वाहून गेली असती. त्यामुळे फक्त बोलून विकास होत नसतो तर तो कृतीतून करावा लागतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी अजितला काळे यांनी शिवसेनेतील गद्दाराच्या गद्दारीचा पाडाच वाचून दाखविला. खऱ्या शिवसैनिकांना व दुसऱ्याची हुजरेगिरी करून साहेब मी तुमचाच आहे म्हणणाऱ्यांना ओळखा असा जबर हल्ला त्यांनी पक्षातील गद्दारांवर चढविला. तर ऍड धनंजय धाबेकर, अमोल जाधव, ऍड अजित खोत, पाटील यांनी पक्षातील गद्दारी व त्या माध्यमातून पक्ष भाजपाच्या दावणीला नेण्याचे काम काही मंडळी करीत असल्याचा थेट आरोप केले. त्यामुळे शिवसैनिकामध्ये असलेली अस्वस्थता बाहेर पडली असून नव्याने काम करण्याचा संकल्प व निर्धार या मेळाव्यातून शिवसैनिकांनी व्यक्त केला. या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने शिवसेना युवासेना महिला आघाडी व विविध आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते
मागील नगर परिषदेच्या निवडणुकीत ४० वर्षांची सत्ता उलथवून शिवसेनेचा नगराध्यक्ष व औकात नसताना उपनगराध्यक्ष केले मात्र ज्या पद्धतीने शिवसेनेच्या काही नेत्यांनी आपली औकात नसताना आता या निवडणुकीमध्ये पंगा घेण्याचा प्रयत्न केला त्याची झळ शिवसेना सर्वसामान्य शिवसैनिकांना बसली असून शिवसेनेला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. मला पक्षप्रमुखांनी सांगितले असते तर धाराशिवची नगरपरिषद शंभर टक्के शिवसेनेच्या भगव्याखाली निवडून आणली असती असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. मूळ भाजपची मंडळी शिवसेनेच्या विरोधात जात नाही कारण भाजप व शिवसेनेचे रक्त एकच आहे. मात्र भाजपच्या मंडळींनी लक्षात घ्यावे की महायुतीचे सत्तांतर होईल त्यावेळी सर्वात अगोदर राणा पाटील हे दुसऱ्या पक्षात उडी मारतील त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असा सल्ला त्यांनी दिला. जिल्ह्यातील भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे) चा गद्दार गट आमदार राणा पाटील यांच्या खिशात असून तेच हे पक्ष चालवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. परंडा व भूम नगर परिषद निवडणुकीत माझ्याविरुद्ध सर्व पक्ष एकत्र आले. त्यांचा मी कंड जिरवीला. आगामी जिल्हा परिषदेमध्ये भाजप सोडून सर्व पक्षांना आमच्या पक्षाची दारे खुली असून सर्वांची आघाडी करण्याचा संदेश त्यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून देत भाजपा विरोधात थेट दंड थोपटले.

