वीर बाल दिन विद्यार्थ्यांनमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिग निर्माण करतो :- प्रा. यशवंत चंदनशिवे.
देशभक्त न्युज - लोहारा प्रतिनिधी / -
लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आज 26 डिसेंबर 2025 रोजी " वीर बाल दिवस " साजरा करण्यात आला. यावेळी गुरु गोविंद सिह आणि त्यांचे दोन शहीद पराक्रमी पुञ साहिबजादा जोरावर सिह व साहिबजादा फतेह सिह यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या अनुष्का देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाल दिनाचे महत्व महाविद्यालयीन विद्यार्थीना सागताना प्रा यशवंत चंदनशिवे म्हणाले, " 26 डिसेंबर हा दिवस सन 2022 पासून वीर बाल दिवस म्हणून देशभर साजरा करण्यास सुरवात झाली. हा बाल दिवस कुमार वयातील मुला - मुलींना देशभक्त कशी केली जाते या प्रेरणा देणारा दिवस आहे. शिख धर्माचे गुरु, गुरु गोविंद सिह आणि त्यांच्या वीर, पराक्रमी पुञानी आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी जो मोगल शासकाच्या विरोधात लढा दिला त्यात गुरु गोविंद सिहच्या साहिबजादा जोरावर सिह वय वर्ष न ऊ वर्ष तर साहिबजादा फतेह सिह वय वर्ष सहा. या दोघांना मोगल शासकाचा सरदार वजीर खान यांनी अटक केली. व त्यांना ईस्लाम धर्म स्विकारण्यासाठी त्याच्यावर अन्याय अत्याचार केले तरिही ते डगमगले नाहीत. जेव्हा या दोन मुलानचे धर्मपरिर्वतन आपण करु शकत नाही तेव्हा चिडून वजीरखानने त्यांना जिवंत भितीत गाढून टाकले. एवढा जुलूम होऊनही या वीर सुपूञानी दयायाचना न करता आपल्या मातृभूमीसाठी, धर्मासाठी आपले प्राणत्याग केले. ते देशासाठी शहीद झाले. हा लहान मुलांनमधील देशभक्तीचे स्फुलीग निर्माण करणारा धगधगता इतिहास या भारत देशाने पाहिला आणि अनुभवला आहे. हा इतिहास मोबाईलच्या व्यसनात गुरुफूटून आपल बालपण आणि तारुण्यपण वाया घालविण्या- या मुला मुलीनपुढे ठेवला पाहिजे. सहा आणि न ऊ वर्ष वयातील वीर बालकाच्या कथा, इतिहास शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनपुढे उभा केला पाहिजे. त्यांनच्यातील वीरवृत्ती जागृत करणे आणि ती देशप्रती समर्मणाचा भाव निर्माण करणे हाच खरा शिक्षणाचा हेतू असला पाहिजे तेव्हाच पून्हा संस्कारित पिढी निर्माण होऊ शकते. यावेळी विलास बाभळे, वैष्णवी लोहार हे महाविद्यालयाचे कर्मचारी तर आण्णासाहेब देवकर, नागेश चव्हाण, अनस शेरीकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या सख्येने उपस्थित होते.
