Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आ . कैलास पाटलांचा अगामी जिप . पंस साठी पदाधिकारी ,कर्यकर्त्यांच्या बैठकांचा झंजावात

 आ . कैलास पाटलांची अगामी जिप . पंस साठी इच्छुकांची चाचपणी  

           बैठकांतून स्थानिक पदाधिकारी , शिवसैनिकांना झालेल्या नगरपरिषद निवडणूकां च्या निकालाने खचून न जाता जोमाने अगामी येणाऱ्या जिप . पंस . निवडणूकांच्या कामाला लगण्याची भावनिक साद 

                  


         देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -

धाराशिव जिह्यात नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणूकांत शिवसेना उबाठा गटास खा . ओमराजे निंबाळकर आणि आ . कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकही नगरपरिषद नगराध्यक्षपद न मिळाल्याने त्यांना मोठ्या पराभावास सामोरे जावे लागल्यामुळे खासदार व आमदार यांनी आपला झंझावात सुरु केला असुन ते बैठकांच्या माध्यमातुन पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी खचून न जाता पुढील काळात येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकासाठी जोमाने कामाला लागावे यासाठी त्यांना धीर व मानसिक बळ देत आहेत . 

येणाऱ्या आगामी जिल्हापरिषद , पंचायत समितीच्या निवडणूका लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची चाचपणी या संदर्भात कळंब तालुक्यातील ईटकूर येथे दि . २६ डिसेंबर रोजी धारीशिव - कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी , कार्यकर्त यांची बैठक घेवून मार्गदर्शन केले .

    या बैठकीत गावपातळीवरील विविध प्रश्न, जनतेच्या अपेक्षा, प्रलंबित विकासकामे तसेच निवडणूक रणनीती यावर चर्चा करण्यात आली. प्रत्येक कार्यकर्त्याने बूथनिहाय जबाबदारी स्वीकारून जनतेच्या संपर्कात राहावे, त्यांच्या प्रश्नांना आवाज द्यावा आणि संघटनात्मक ताकद अधिक बळकट करावी, असे आवाहन आ . पाटील यांनी यावेळी आले..

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही केवळ उमेदवारांची नाही तर कार्यकर्त्यांच्या निष्ठा, परिश्रम आणि समर्पणाची कसोटी आहे, जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर प्रत्येक जागेवर सक्षम व विश्वासार्ह उमेदवार देऊन निवडणूक प्रामाणिकपणे जिंकण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

                  


बाळासाहेब गंभीरे यांच्यावर शिवसेना ईटकुर विभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपवत त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

संपन्न झालेल्या बैठकीस शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रदिप मेटे , कृउबास संचालक भारत सांगळे , तालुका प्रमुख सचिन काळे , युवा सेना तालुका प्रमुख पंडित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती .

या बैठकीसाठी ईटकुर जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या गावातील पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इच्छुकांची पक्षश्रेष्ठीकडे  जिप . पस . उमेदवारीसाठी नावनोंदणी .

   ईटकूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी ईटकूर येथील अभयसिंह आडसुळ , प्रदिप फरताडे , विभाग प्रमुख बाळासाहेब गंभीरे , अजितसिंह पाटील , पोपट आडसुळ , रितेश लगाडे तर बोरगाव ( ध ) येथील पक्षाचे जिल्हा संघटक प्रा .दिलीप पाटील , गंभीरवाडी येथील पवन आडसुळ यांनी इच्छुक असुन  

ईटकूर पंचायत समिती गणासाठी बोरगाव (ध ) भारत सांगळे ,बहुला आश्रुबा बिक्कड , ईटकूर दिनकर शिरसागर , भोगजी संतोष खराटे ,

तर मस्सा ( खं . ) पंस . गणासाठी , व्यंकटेश थोरात , बापु इंगोले , अरुण वरपे , तुकारात थोरात , दादासाहेब थोरात , अनिल वरपे , नितिन सावंत , कन्हेरवाडी माणिक मिटकरी ,अक्षय जाधव , आप्पासाहेब मिटकरी , वाकडी बालाजी कोल्हे , या इच्छुकांनी ईटकूर जिल्हा परिषद गट , ईटकूर पंचायत समिती गण आणि मस्सा ( खं . ) गणामधून लढण्यास उमेदवारी मिळवी यासाठी पक्ष श्रेष्ठीकडे आपली नावे नोंदवली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.