पाथरूड येथील खंडोबा यात्रा निमित्त श्रीक्षेत्र धारवाड येथून ज्योत आणण्यासाठी भाविक भक्त रवाना
देशभक्त न्युज - भूम प्रतिनिधी / - ( कुणाल लगाडे)
तालुक्यातील पाथरूड येथून पाथरूडच्या खंडोबा यात्रा निमित्त श्रीक्षेत्र धारवाड येथून ज्योत आणण्यासाठी जय मल्हार मित्र मंडळ पाथरूड रवाना चंपाष्टमीनिमित्त खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र धारवाड या ठिकाणी जागृत देवस्थान खंडोबा पाथरूड यांच्या वतीने,पायी ज्योत सोहळ्याची सुरुवात आज नारळ फोडून करण्यात आली.
गावातील खंडेरायाचे भक्तगण कर्नाटकातील धारवाड- सांगली - पंढरपूर- परंडा मार्गे उद्या पाथरूड येथे पवित्र ज्योत घेऊन सकाळी रवाना होतील.
सदरील ज्योत सोहळ्यास सर्व भक्त गणास डॉ . चेतन बोराडे यांनी शुभेच्छा दिल्या व तसेच माय बाप शेतकरी नागरिक यांच्यावर अतिवृष्टीने कोसळलेल्या संकटातून लवकर बाहेर पडण्याची कृपा कर हीच प्रार्थना खंडेरायाच्या चरणी यानिमित्ताने केली आणि येळकोट येळकोट जय मल्हार करत भाविक भक्त रवाना झाले.
