ईटकूरात जिप / पंस सार्वत्रिक निवडणूकीत ७० . १३ % मतदान तर ५१०० मतदारांपैकी ३५७६ पुरुष व महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
एकूण किती पुरुष - महिलांनी वॉर्ड निहाय मतदानाचा हक्क बजावला बातमी सविस्तर पहा
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
७ फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्हा परिषद व जिल्ह्यातील तालुका निहाय पंचायत समित्यांच्या निवडणूका सकाळी ७ . ३० ते सायंकाळी ५ . ३० या वेळेत संपन्न झाल्या त्याचाच भाग म्हणून कळंब तालुक्यातील ईटकूर येथे जिल्हा परिषद प्रशाला व जिपकेंप्रा शाळा येथे ही मतदान प्रक्रिया पार पडली .
एकूण ५ बुथवर आयोजित निवडणूक प्रक्रीयेसाठी प्रशासनाचे कर्मचारी , पोलीस बंदोबस्त यांची चोख व्यवस्था राबविण्यात आली होती .
संपन्न झालेल्या जिप / पंस सार्वत्रिक निवडणूकीत ईटकूर येथे ७० . १३ % मतदान झाले . येथील ५१०० मतदारांपैकी ३५७६ पुरुष व महिला मतदारांनी आपला या प्रक्रीयेत सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावला यामध्ये वॉर्ड क्र . १ - ९ / ४ मध्ये - ३६९ पुरुष , ३०५ महिला असे - ६७४ मतदार , वॉर्ड क्र . २ - ९ / ५ मध्ये - ४०० पुरुष , ३९० महिला असे - ७९० मतदार , वॉर्ड क्र . ३ - ९/६ मध्ये - ४३३ पुरुष , ३६१ महिला असे - ७९४ मतदार , वॉर्ड क्र . ४ - ९ /७ मध्ये - ३३४ पुरुष , ३०० महिला असे - ६३४ मतदार , वॉर्ड क्र . ५ - ९ / ८ मध्ये - ३६० पुरुष , ३२४ महिला असे - ६८४ अशा एकूण ३५७६ पुरुष , महिला मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवून मतदान केले .
