धाराशिव जिल्ह्यातील अंशकालीन निदेशक यांच्या वतीने सगट कुटुंबियांना मदतीचा हात
अंशकालीन निदेशक यांच्या वतीने मिळालेल्या मदतीने कुटुंबियांचे डोळे पानावले
स्तुत्य उपक्रम
देशभक्त न्युज - धाराशिव प्रीतीनिधी / -
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा या गावचे लक्ष्मण सगट यांचे 2018 मध्ये निधन झाले 2012 ला ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहारा येथे कार्यरत होते . सगट यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात त्यांची आई , मुलगा, मुलगी व त्यांच्या पत्नी हे कुटुंब आज रोजी बिकट परिस्थितीचा सामना करीत उदरनिर्वाह करतात त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील अंशकालीन निदेशक यांच्या वतीने या परिवारातील त्यांच्या आई , मुलगा, मुलगी व त्यांच्या पत्नी यांना कपडे , व रोख स्वरूपात रक्कम मदत म्हणून देण्यात आली .
मिळालेल्या मदतीने कुटुंबियांचे डोळे पानावले ....
कै . सगट सरांच्या मित्रमंडळीनी दिलेला मदतीचा हात आणि घडविलेले मित्रत्वांनी अपुलकीच्या माणूसकीचे दर्शन यामुळे मिळालेल्या मदतीने कुटुंबियांचे डोळे पानावले .
अंशकालीन निदेशक बांधवा कडून सगट कुटुंबियांना त्यांच्या ग्रुपद्वारे मदतीची साद आणि सर्वांचा सहभाग .....
सगट कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची आहे आहे असा मॅसेज मन्सुर तांबोळी यांनी अंशकालीन निदेशक ग्रुप च्या माध्यमातून प्रसारित करून सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले असता सर्व अंशकालीन निदेशक बांधवांनी सहभाग घेत चा त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक मदत केली .
जमा झालेल्या मदतीतून कै .सगट यांच्या पत्नीला साडी मुलांना कपडे व त्यांच्या आईला इरकल साडी व रोख रक्कम देवून माणूसकीचे खरे दर्शन पाहुन त्यांच्या आई च्या डोळ्यातील अश्रू हे दुःखाचे व आनंदाचे उपस्थितांना दर्शन घडवणारे होते . तर कुटुंबांला केलेली छोटीशी मदत ही सर्वांना खूप प्रेरणादायी वाटली .
यावेळी मोशीन शेख, रणजित पाटील, सौदागर पापु,मन्सूर तांबोळी, बालाजी सूर्यवंशी, खालीक शेख, बंडू पोतदार, कै .लक्ष्मण सगट सर यांच्या कुटुंबातील सर्व उपस्थित होते .
