Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पानगाव येथे अफू लागवडीवर पोलीसांची कारवाई अंदाजे दीड लाख रुपये किंमतीचा अफू

 पानगाव येथे अफू लागवडीवर पोलीसांची कारवाई 

 अंदाजे दीड लाख रुपये किंमतीचा अफू 

वाशी , कळंब तालुक्यात मागिल कांही दिवसात अफूच्या लागवडीवर पोलीसांच्या मोठ्या कारवाया 

 देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनिधी / -

कळंब तालुक्यातील पानगावमध्ये अफूच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून येरमाळा पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचे अफूचे पीक जप्त केले आहे. वाशी - कळंब तालुक्यात अवैध अंमली पदार्थांच्या लागवडी विरोधात पोलिस मोठी धडाकेबाज कारवाई करत असल्याचे मागिल कांही दिवसापासुन दिसून येत आहे याचाच एक भाग म्हणून कळंब तालुक्यातील येरमाळा येथून जवळच असलेल्या पानगाव शिवारामध्ये शेत गट क्रमांक १४१/ व ४ या मध्ये असलेल्या शेतामध्ये अफूची शेती आहे या माहितीवरुन येरमाळा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तात्याराव भालेराव यांनी व यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहिले असता पानगाव येथील बाबासाहेब वाघमारे यांचे सदरचे शेत गट नं. १४१ / व ४ यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळून आली साडेचार किलो वजनाचे अफूचे पीक पोलिसांनी जप्त केले असून त्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत १४११५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.घटनास्थळी पंचनामा करण्यात आला संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची पोलीस सुत्रांकडून माहिती देण्यात आली .

या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर लागवड करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे, पोलीस उपनिरीक्षक आवारे, तानाजी काळे, पोकॉ. किरण शिंदे, रवींद्र कांबळे, निलेश जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.