भाजपाचे उमरगा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे आणि भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांची बैल पोळा सण भेट
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी - /
बळीराजाचा शेतातील मशागतीचा सोबती म्हणजे बैल आणि त्याच पशुधन बैलांचा आज सण याच सणा निमित्त ईटकूर येथे भाजपाचे उमरगा तालुकाध्यक्ष तथा डिसीसी मा. व्हा चेअरमन , मा . जिप सदस्य कैलास (दादा ) शिंदे आणि भाजपा संलग्न भाजपा चित्रपट कामगार आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण (तात्या ) शिंदे - पाटील यांनी शिंदे परिवाराच्या वतीने काढण्यात आलेल्या पारंम्पारिक हलगीच्या तालात सजविलेल्या बैलांच्या मिरवणूकीत सहभाग घेवून पोळा सणाचा आनंद घेतला आणि आज पशुधन धोक्यात येत असतानाही शिंदे परिवाराकडून पशुधनाचे जतन करून त्यांच्यावर मनोमन प्रेम करतात याबद्दल त्यांचे अभिनंदण करून त्यांना पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी पशु प्रेमी शिवाजी बापु धर्मा शिंदे , शंकर धर्मा शिंदे या बंन्धू सह परिवारातील मंडळींनी हलगीच्या सुरात वाजत गाजत बैलांच्या पाठीवर रंगीबेरांगी झुली , मस्तकी बाशिंगे , रंगविलेल्या शिंगावर फुगे अशा सजविलेल्या बैल पशुधनाची आदल्यांच्या सलामीने गावातील प्रमुख रस्त्यावरून मिरणूक काढुन शेवटी याच सजविलेल्या पशुधनाचा कुटुंबातील लहान थोर महिला , पुरुष मंडळींनी एकत्रित येवून अगदी मनोभावे आनंदी वातारणात विवाह सोहळा पार पाडला .

