Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बदलापूरच्या नराधमाला तात्काळ फाशी द्या-सातलिंग स्वामी

 बदलापूरच्या नराधमाला तात्काळ फाशी द्या-सातलिंग स्वामी 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन 

उमरगा - लोहारा विधानसभा क्षेत्रातील सर्व शाळांचे कर्मचारी अन् स्वच्छतागृह तपासणी करण्याची केली मागणी

   

देशभक्त न्युज - उमरगा प्रतिनिधी / -   

बदलापूर येथील शाळेतील लहान मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवा संघटनेचे पदाधिकारी सातलिंग स्वामींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दि 22 रोजी निवेदन देत तात्काळ फाशी देण्याची मागणी करत उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रातील सर्व खाजगी, जि प शाळा आणि संस्थेच्या शाळातील कर्मचाऱ्यांची पार्शभूमी,शाळेला मुलींना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांची पार्शभूमी तथा वाहनाचे पेपर आणि शाळेत मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित स्वच्छतागृह आहेत का? याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

          

निवेदनात म्हटले आहे की,आपल्या महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील अवघ्या साडे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला (गुन्हेगाराला)जलदगती न्यायालयात सदर केस चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आपण महाराष्ट्र शासन विशेष पुढाकार घ्यावा जेणेकरून भविष्यात असे कृत्य कोणीही करणार नाही, आपल्या या निर्णयाचे देशातील सर्व नागरिक प्रतीक्षा करत आहेत.लोकांच्या/पालकांच्या खुप अपेक्षा आपल्याकडून आहेत तसेच माझ्या उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघातील सर्व खाजगी आणि जि प शाळा व संस्थेच्या शाळांची विशेष तपासनी करून शाळेतील कर्मचाऱ्यांची पार्शभूमी तपासन्यात यावी ज्यांची गुन्हेगारी पार्शभूमी आहे अश्याना काढून टाकण्यात यावे. तसेच शाळेला शालेय मुलींना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या व खाजगी वाहणाच्या पेपर आणि वाहन चालक व्यसनाधीन तथा गुन्हेगारी पार्शभूमीवर वाहन चालक परवाने रद्द करण्यात यावे तसेच सर्व शाळेत मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वछतागृह आहेत का..? नसतील तर तात्काळ बांधून घेण्याबाबत आदेश करावें अन्यथा त्या संबंधित शाळेवर कारवाई व्हावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.