देशभक्त ने रोख - ठोक बातम्यांच्या माध्यमातुन आपली वेगळी ओळख निर्माण केली .
- राहुल ( भैय्या ) गदळे
देशभक्त न्युज - केज प्रतिनिधी / -
देशभक्तच्या वर्धापन दिन विशेष पुरवणीचे विमोचन भाजपाचे युवा नेते तथा काळेगाव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रचार्य , संस्थेचे सचिव राहूल ( भैय्या ) गदळे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी गदळे यांनी देशभक्तच्या प्रिंन्ट आणि सोशिएल क्षेत्रातील कामकाजाचे कौतुक करून देशभक्त चे अभिनंदण केले .
देशभक्त या वृत्तपत्राने ११ वर्षात आपल्या अचूक आणि सर्व समावेशक परंतु रोख - ठोक आणि सडेतोड बातम्यांच्या माध्यमातुन आपली अगळी वेगळी अशी आजच्या स्पर्धेच्या युगत वृत्तपत्रक्षेत्रात ओळख आणि आदरयुक्त दबदबा ठेवला असुन वाचक , जाहिरातदार , हितचिंतक यांच्या सोबतीने यशस्वी अशा वाटचालीतून १२ व्या वर्षाच्या पदार्पण केले आहे .
देशभक्त ने प्रिंन्ट मिडीया सोबतच सोशिएल मिडीयात ही चांगले स्थान मिळविले असुन विनाराजकीय पाठबळ चालणाऱ्या निपक्ष :पाती अशा या वृत्तपत्रास शुभेच्छा देताना मनोमन आनंद वाटतो व देशभक्त ची अशीच प्रगती व्होवो व शोषित , पिडीत , सर्वसामान्यांना यापुढेही न्याय देण्याकामी त्यांच्या माध्यामातुन कार्य घडावे अशा शुभेच्छा भाजपाचे युवा नेते तथा काळेगाव (घाट ) कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य , संस्थेचे सचिव राहुल ( भैय्या ) गदळे यांनी देशभक्तच्या वर्धापन दिन पुरवणी विमोचन प्रसंगी दिल्या .
यावेळी देशभक्त चे कार्यकारी संपादक रोहीतराजे शिंदे , महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांची उपस्थिती होती .
