उमरगा - लोहारा विधानसभा मतदार संघातुन इच्छुक उमेद्वार सातलिंग स्वामी यांच्या कर्याची स्तुती व कौतुक करुन आपले काम असेच सुरु ठेवा,आम्ही सोबत आहोत
भेटी दरम्यान शिवसेना नेते आ. सचिन अहिर यांची ग्वाही
देशभक्त न्युज उमरगा / -
गेल्या वर्षभरापासून उमरगा लोहारा मतदारसंघात जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आपुलकीने आणि आत्मीयतेणे पुढाकार घेणारे माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीयसहाय्यक सातलिंग स्वामीं यांनी दि 26 ऑगस्ट रोजी विधानपरिषद आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नेते आ. सचिन अहिर यांची सदिच्छा भेट घेतली दरम्यान उमरगा लोहारा मतदार संघातून ठाकरे गट सेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा स्वामी यांनी व्यक्त केली असता आ. सचिन अहिर यांनी सातलिंग स्वामींच्या या मतदार संघातील सुरु असलेल्या कार्याचे कौतुक करुन आपले कार्य असेच सुरु ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊ आणि तुमच्या उमेदवारी बाबत सकारात्मक बोलू असे अश्वासन अहिर यांनी या भेटी दरम्यान दिले यावेळी राहुल नावंदे आणि सचिन वाले आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यापासून सातलिंग स्वामी यांच्या कार्याची जोरदार चर्चा तालुक्यातच न्हवे तर जिल्हाभरात गाजत आहे. दिव्यांग, अनाथ, विधवा, मजूर, कामगार, शेतकरी, पिडीत शोषित व्यक्ती केवळ एक फोन द्वारे आपल्या अडचणी कळविल्या तरी त्याबाबत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेताना स्वामी दिसून येत आहेत.
तालुका व परिसरातील सुशिक्षित तरुण युवक युवतीना त्यांच्या शैक्षणिक दर्जेनुसार हक्काचा रोजगार प्राप्त व्हावा यासाठी उमरगा औद्योगिक वसाहतीत नामवंत कंपनीचे आगमन होणे अत्यावश्य आहे.पेरणी झाल्यापासून पावसाने दांडी मारल्याने पिके जळून खाक झाली आता बँकेचे कर्ज शेतकऱ्यांने फेडायचे कसे.? त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना विनाअट पिक कर्ज देण्यात यावा आणि या भागातील शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्यात यावे.भूकंपग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलणे आदी विषयावर यावेळी सविस्तर चर्चा झाली असल्या बाबातची माहिती सातलिंग स्वामींनी यांनी देशभक्तशी बोलताना दिली.
