अनुसूचित जाती व नव बौद्धांच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ वाटप करा - राजाभाऊ राऊत यांची मागणी
देशभक्त न्युज /धाराशिव प्रतिनिधी -
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात जागा कमी असल्याने पात्र असूनही प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त,कार्यालयाकडे जवळपास पंधराशे ते सोळाशे (1500/1600) विद्यार्थ्यांनी अर्ज करूनही अद्याप त्यांना दोन वर्षांपासून या योजनेचा लाभ मिळालेला नाही आपल्या स्तरावरून या योजनेसाठी सहा ते सात कोटी रुपयांची आवश्यकता आहे यासाठी आर्थिक तरतूद करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे टाकून वाटप करण्यात यावे आशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व समाज कल्याण मंत्री याना देण्यात आले आहे.याविषयी सविस्तर माहिती अशी की उस्मागनाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहरात येऊन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतः भाड्याने राहून,भोजनाची सोय करून,शिक्षण घेत आहेत या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन व निवासाची सोय व्हावी याकरिता वर्षाला 40 ते 50 हजार रुपये अनुदान स्वरूपात शासन देते परंतु स.न. 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सरकारने पैशाची तरतूद केलेली नाही मा.सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग उस्मानाबाद यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून सहा ते साडेसहा कोटी रुपयांची मागणी केली आहे पण अद्याप पैसे आलेले नाहीत.विद्यार्थी कार्यालयाकडे चकरा मारून परेशान आहेत अनुसूचित जाती व नव बौद्धांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे की नाही का त्यांनी शिक्षण घेऊ नये अशी शासनाची भूमिका आहे का? या योजनेची अंमलबजावणी का करत नाही उस्मानाबाद शहरातील पाच किलोमीटर पर्यंत असलेल्या सर्व कॉलेजचा या योजनेमध्ये समावेश करून तेथील विद्यार्थ्यांना व पूर्वी वंचित राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा हा नियम राज्यातील महानगरपालिका सह सर्व नगरपरिषदेला लागू आहे
भारतरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ तात्काळ वाटप करण्यात यावा.अन्यथा पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,तालुकाध्यक्ष संपत सरवदे, बहुजन स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान सरवदे, नेताजी लोंढे, नवनाथ जोगदंड, लहू खंडागळे, राजाभाऊ साबळे, जिंदाशहा फकीर, पत्रकार प्रमोद राऊत, शितलकुमार शिंदे आदींच्या सह्या आहेत आहे.
