ज्येष्ठ नागरिक महासंघाकडून स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकाची पत्नी महानंदा पवार यांचा सत्कार
देशभक्त न्युज / कळंब -
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून आपले कर्तव्य बजाविणारे सैनिक कै.शंकर पवार यांच्या पत्नी महानंदा शंकर पवार यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केले तसेच स्वातंत्र्याची 75 अमृत महोत्सवी वर्षे पूर्ण होत आहे आहे यानिमित्त त्यांचा ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने शाल ,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रदेश सचिव डी.के. कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भडंगे यांची उपस्थिती होती याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. के. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात कै.शंकर पवार यांनी भारतीय सैन्य दलात 1962 भारत - चीन युद्ध 1965 व 1971 भारत - पाकिस्तान युद्धात सैन्याला रसद पुरविण्याचे कार्य केले आहे त्यांच्या या कार्याबद्दल 1996 मध्ये मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे सत्कारही करण्यात आला होता कठीण युद्ध प्रसंगी त्यांच्या पत्नी महानंदा पवार यांनी पतीला खंबीर साथ दिली व पुढे शंकर पवार व महानंदा पवार यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे आपले घर ,परिसर व गल्ली स्वच्छ असावी यासाठी त्यांनी हाती झाडू घेऊन दररोज साफसफाई करण्याचे कार्य केले आहे त्यांच्या या कार्यात साथ देणाऱ्या महानंदा पवार यांचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे असे गौरवोद्गार काढले या कार्यक्रमात मुलगा विजय शंकर पवार यांचाही सत्कार करण्यात आला उपस्थित महादेव महाराज अडसूळ प्रकाश भडंगे, शिवाजी गिड्डे ,बापू भंडारे, प्रमोद नरहिरे ,बाळासाहेब कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार बंडू ताटे यांनी मानले
