जालिंदर सस्ते सेवा मंडळ,आश्रृम न्यास व मृदंगमहर्षी जालिंदर सस्ते यांच्या आमृत मोहोत्सवा निमित्त धार्मिक ,सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन .
देशभक्त न्युज / येडशी -
येडशी येथील मृदंगमहर्षी जालिंदर सखाराम सस्ते ( बप्पा ) यांच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध सामाजिक ,धार्मिक सांस्कृतिक ,कार्यक्रमाचे आयोजन सन 2023 - 24 मध्ये नियोजित करण्यात आले आहे.यासाठी येडशी येथील श्री संत वै .रामकृष्ण भाऊ , श्रीसंत वै.भगवान भाऊ तापडिया ,वै परमेश्वर महाराज आश्रम न्यास व मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा) सस्ते वारकरी सेवा मंडळ येडशी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने समाजातील संगीत ,धार्मिक ,आन्नदान , भारूड .या क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करणे ' वृक्ष लागवड ,कीर्तन , प्रवचन ,तसेच .गायन ,वादन ,नृत्या त्याच बरोबर होम हवन आदि पारंपारीक संस्कृती जोपासत
कार्यक्रमाचे आयोजन करून आमृत मोहोत्सव साजरा करण्यात येईल याचा कार्य आरंभ त्यांचे मृदंगकलेचे गुरुजी -
श्रीसंत भगवान भाऊ तापडिया याच्या पुण्यतिथीच्या औचित्यावर दि 30 ऑगस्ट 2023 पासुन होणार आहे . पुढील उपक्रम क्रमशा नियोजना नुसार प्रसिद्धी देऊन डिसेंबर 2024 पर्यन्त पुर्ण करण्यात येतील .
यासाठी त्यांचा शिष्य परीवार तसेच त्यांना मांनणाऱ्या वारकरी सांप्रदयातिल हितचिंतक ,आश्रम संस्थान व मृदंगाचार्य जालिंदर बप्पा सस्ते सेवा मंडळ यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री महादेव जालिंदर सस्ते ( गुरुजी ) यांनी कळवले आहे .
सस्ते बप्पा यांचे कार्य -
येडशी येथे सन 1988 साली येडशी ता उस्मानाबाद येथे वारकरी सेवा मंडळाची उपासना हाती घेऊन कार्य हाती घेतले .यामध्ये त्यांनी गुरुकुल पद्धतीने निवासी विद्यार्थी ठेऊन घेऊन त्यांना संगीत, पारंपारीक कला ,वारकरी सांप्रदाईक धडे देण्याचे कार्य हाती घेतले त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्हातील सर्व सामान्य मुलांना निस्वार्थपणे गुरुकुल पद्धतीणे शिक्षण दिले.कोणतीही स्वार्थी भाव न ठेवता निस्वार्थीपणे त्यांनी कलात्मक व पारंपारिक संस्कृती जतन ठेवून हजारो मुलांना त्यांनी घडवले .सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मायेची चादर करून आपल्या छायाचित्राखाली विनामुल्य घडवले . महाराष्ट्रासह इतर राज्यातील शहरांमध्ये त्यांनी आपल्या मृदंग कलेचा ठसा उमटवत प्रसार केला .त्यांना वारकरी संप्रदायतील मृदंग कलेचे उपासक म्हणुन महाराष्ट्र भर ओळखले जाते.त्यांच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली ,ऋषिकेश ,तिरुपती बालाजी देवस्थान ,गुलबर्गा, शासकीय स्थराव पारंपारीक कला साजरीकरण या ठिकाणी कार्यक्रम करून लौकीक प्राप्त केला आहे .महाराष्ट्र शासनाने कला क्षेत्रात संस्था म्हणुन नामांकन प्राप्त झाले आहे .त्याच बरोबर त्यांना वृद्धकलावंत म्हणुनआज राज्य व केंद्र शासनाच्या वतीने सस्ते बप्पांना मासिक मानधन देऊन शासनाने पुरस्कृत केले आहे .तर वारकरी संप्रदायातील विविध परंपरेने त्यांना गौरव करून सन्मानीत केले आहे , आज 36 वर्ष ते हे कार्य कोणतीही शासकिय मदतीवीना करत आहेत .थोडक्यात कलाक्षेत्रातील शिक्षणमहर्षि व समाजकार्यातील सर्व सामान्य कुटुंबातील बालकांना स्वावलंबी बनवनारे व्यक्ती महत्व म्हणुन धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील जालिंदर सखाराम सस्ते (बप्पा ) म्हणुन ओळखले जाते .
