बावी येथील भीमनगराचा रस्ता म्हणजे रात्यात पाणी की पाण्यात रस्ता रस्त्याला आले डबक्याचे स्वरूप
ग्रापचे दुर्लक्ष का ? नागरिकांची होतेय हेळसांड सर्वांना पडला प्रश्न
देशभक्त न्युज - वाशी / .
तालुक्यातील बावी येथील भीमनगर मधून गावात जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बोरिंग चे पाणी साठवून रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे सदैव वर्दळ असणारा हा रास्ता पाण्यात की पाणी रस्त्यावर असा प्रश्न नागरीकांना पडला असुन या वर्दळीच्या रस्त्याकडे ग्रापचे का दुर्लक्ष आहे असा प्रश्न नागरीकातुन पुढे येत आहे . नागरिकांना मात्र या रस्त्यावरुन ये जा करताना , साचलेल्या व येणाऱ्या जाणाऱ्या घान पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. गावातील इतर प्रभागातील रस्ते एकदम चकाचक मात्र भिमनगरातुन गावात व शेतात जाणाऱ्या या रस्त्याला सध्या तरी डबक्याचे स्वरूप आले आहे या रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी बावी ग्रापं ने तसेच संबंधितांनी याची तातडीने दखल घेवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी. यावेळी समाजसेवक कार्यकर्ते दात्ता शिंदे.रावणधावारे. मेघराज धावारे. महादेव धावारे . लिंबराज (बप्पा)धावारे .सागर निकाळजे. रघुनाथ गरड. मारुती धावरे. सचिन धावरे . श्रीधर धावरे . दयानंद धावारे . गणेश धावारे वार्ड क्रमांक चार या प्रभागातील नागरिकांनी केली आहे.
