आदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
देशभक्त न्युज - बीड / -
बीड येथील आदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातुन नुकतेच पास झालेल्या विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांत चांगल्या पदावर निवड झाली असुन यातील चेतन सातपुते याची न्यू हॉलंड या ट्रॅक्टर कंपनी मध्ये प्रोजेक्ट ऑफिसर, खोसे शुभम याची किसान मौल्डींग (सिंचन कंपनी), मांडवकर किरण याची आइरिस पॉलिमर (पॅकेजिंग) व विधाते अभिषेक याची रिउलीस इरीगेशन (सिंचन कंपनी) मध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्रजी सारडा, संचालिका डॉ. आदितीजी सारडा, महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल सानप, प्राचार्य श्याम भुतडा, प्रशासकीय अधिकारी डॉ. अरुण मुंडे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्या दिल्या.
