Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुष्काळाच वास्तव युवट्युबवर कवितेतुन मांडणाऱ्या कवी सुरेश कांबळेची सर्वस्तरातुन स्तुती

 दुष्काळाच वास्तव युवट्युबवर कवितेतुन मांडणाऱ्या कवी सुरेश कांबळेची सर्वस्तरातुन स्तुती 


                  

देशभक्त न्युज - दहिफळ / -

कळंब तालुक्यातील बाभळगाव या ग्रामीण भागात वास्तव्य करणारे कवी , गायक , गितकार , चारोळीकार आदि क्षेत्रात स्वतः च्या कर्तृत्वावर आपली अगळी वेगळी अशी सर्व स्तरात ओळख निर्माण करणारे युवा व्यक्तीमत्व म्हणजे सुरेश कांबळे हे ओळखले जातात .

कांबळे यांनी सध्या सर्वत्रच पडत नसलेल्या पावसावर आणि त्यामुळे येथील जनजीवनावर , पिकांवर , पशु प्राण्यावर सर्व क्षेत्रावर झालेल्या परिणामा बाबात आपल्या कवितेतुन वास्तव परिस्थिती कथन करून ती युट्युबवर प्रसारीत केली आहे .

त्यांच्या या कवितेचे सर्वच स्तरातुन उस्फुर्त पणे स्वागत करण्यात येत असुन त्यांची सर्वत्र स्तुती होत आहे .

त्यांनी मराठवाड्यातील दुष्कळाचे भिषण वास्तव प्रत्यक्ष ऑनदीस्पॉट चित्रीकरण करून ते काव्य पंक्तीत उतरविले आहे .

ते काव्य पंक्तीतुन म्हणतात " आज संपूर्ण मराठवाडा , दुष्काळाच्या सावटात जगतोय , एक एक थेंब पाव सासाठी , तो ढगाकडे बघतोय . पिकांचा रंग बदललाय , अन् माना ही टाकल्यात टवटवीत पणा गेला , सर्‍यान सऱ्या सुकल्यात , खूप आशेनं काळ्या आईची ओटी भरली होती , खुप सारी स्वप्न , मातीमंधी पेरली होती . पण यंदा पावसाने , भलताच हात आखडलाय , आम्हा शेतकऱ्यांचा जीव , नुस्ता सुपात पाखडलाय . नदीनाले कोरडे पडले , विहिरी तलाव आटलेत , आभाळात कोरडे ढग , अन् डोळ्यात अश्नु दाटलेत . 

 " जशीजशी उभी पीकं , डोळ्यांदेखत करपू लागली , तसतशी शेतकऱ्यांची , तहानभुख हरपू लागली . जितराबांच कसं होईल , ही चिंता खाऊ लागली , चारा आणि पाण्याची समस्या भेडसावू लागली . दुष्काळाचं सावट , गडद होवू लागलय , पुन्हा शेतकर्‍यावर, एक संकट येवू लागलय . या वर्षी खर्च बी निघल , असं बिल्कुल वाटत नाही , आंम्ही जगावं की मरावं , हा वर्षानु वर्षाचा तिढा सुटत नाही " .

या कवी कांबळे यांच्या वास्तव सद्यपरिस्थितीवर केलेल्य कवीतेची सर्वत्र चर्चा असुन कांबळे यांच्यावर अभिनंदणाचा वर्षाव होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.