Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सातलिंग स्वामींच्या अभिष्टचिंतनात 'सात' महाराजांचा आशीर्वाद,जनता देणार साथ?

 सातलिंग स्वामींच्या अभिष्टचिंतनात 'सात' महाराजांचा आशीर्वाद,जनता देणार साथ?


          


महाराजांनी फुंकला निवडणूकीचा शंख:दिला आशीर्वाद 'यशस्वी भव'


उमरगा प्रतिनीधी -

शिवा संघटनेचे पदाधिकारी तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामींचा वाढदिवस उमरगा शहरात मोठ्या उत्साहात परिसरातील सात महारांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी उपस्थित महाराजांनी विधानसभा निवडणूकिला अनुसरून शुभाशीर्वाद दिला आणि काही भाकीतही केले तसेच या सोहळ्यात विविध संघटनानी आपापल्या परीने निवडणूकीच्या रणागणात सहकार्यांची भावना व्यक्त केले.त्यामुळे हा अभिष्ठचिंतन सोहळ्यापेक्षा एखाद्या निवडणूकीच्या अनुषंगाने भरवलेली जणू जाहीर सभा भासत होती.

          गेल्या वर्षभरापासून सातलिंग स्वामींनी उमरगा-लोहारा तालुक्यातील जनतेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसून येत आहेत. वेळोवेळी जनतेच्या विविध लहान-सहान अडचणींना ते सकारात्मक पाठपुरावा करीत पिडित शोषित वंचित घटकला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येतात.याचाच फलित जणू त्यांचा दिवसेंदिवस या दोन्ही तालुक्यातील जनतेशी संपर्क वाढत आहे.

     दि 1 सप्टेंबर रोजी शहरातील शांताई मंगल कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील व परिसरातील एकूण सात महारांची प्रमुख उपस्थिती दिसून आली.श्री.श्री. श्री.राजशेखर शिवाचार्य महास्वामी, विरक्त मठ नंदगाव,श्री.श्री. श्री.१०८ श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी नागणसूर,श्री.श्री. श्री.१०८ सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी,आळंद जि गुलबर्गा,श्री.श्री. श्री.१०८ निलकंठ शिवाचार्य महास्वामी मैंदर्गी,श्री.श्री श्री विरंतेश्वर महास्वामी विरक्त मठ,केसरजवळगा,श्री. श्री. श्री. १०८ सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, हिरेमठ संस्थान लोहारा,श्री.श्री.श्री १०८ शिवयोगी शिवाचार्य महास्वामी अणदूर,श्री.श्री,श्री,१०८ अभिनव सुतरेश्वर महास्वामी हिरेमठ संस्थान अचलेर आदी महाराज भगव्या वेशभूशेत यावेळी मंच्यावर दिसून आले.सर्व मठाधिशानी मंत्रोपचार करीत सातलिंग स्वामींना शुभाशीर्वाद देत काही 'यशस्वी भव' असा आशीर्वाद देऊन निवडणूकीच्या रानांगणात आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत, यश आपल्याच पदरात पडेल असे भाकीत केले.

        सदर अभिष्टचिंतन सोहळा ज्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता तो शांताई मंगल कार्यालय उमरगा-लोहारा-जळकोट-अणदुर-सोलापूर-उस्मानाबाद -तुळजापूर व परिसरातील नागरिकांनी पुर्णपणे खचखाच भरलेला दिसून आला. संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटना,शिवा संघटना, ठाकरे गट शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, ऊसतोड कामगार संघटना, बंजारा समाज संघटना आदींच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्टीत व सर्वसामान्य नागरिकांनी सातलिंग स्वामींचा यथोचित सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे आणि प्रविण स्वामींनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. यावेळी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव शहापुरे, सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, जेष्ठ शिवसैनिक महावीर अण्णा कोराळे,राष्ट्रवादी काँग्रेस चे संजय पवार,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे,ऊसतोड कामगार संघटनेचे श्री पवार, तानाजी दंङगुले, आदिन्सह इतर मान्यवरांनी शॉल फेटा व पुष्पहार घालून सातलिंग यांचा सत्कार केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.