मराठा आरक्षण पोलीसांच्या लाठी हल्ला प्रकरणी ईटकूरात कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध
देशभक्त न्युज - ईटकूर /-
कळंब तालुक्यातील ईटकूर येथे गावच्या वतीने अंतरली सराटी जिल्हा जालना गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण शांततेत सुरू असताना उपोषण स्थळी पोलीसांकडून उपोषण कर्ते व गावकरी महिला , पुरुषावर लाटी चार्ज करण्यात आला याच्या निषेधार्थ पूर्ण गाव कडकडीत
स्वयंस्फूर्तीने शांततेत बंद ठेवून पोलीसांच्या कृतिचा निषेध करण्यात आला .
यावेळी " आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं " , आरक्षण देत कसे नाहित घेतल्याशिवाय आंम्ही राहात नाही , सरकार विरोधीही घोषणा यावेळी देण्यात आल्या .
