आदित्य महाविद्यालयात क्रीडा दिन उत्साहात साजरा
देशभक्त न्युज - बीड / -
बीड येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत आदित्य कृषी, कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्र व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी योग ही केवळ शारीरिक क्रिया नसून शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा असल्याचे मत योगाचार्य ढोबळे सर यांनी व्यक्त केले. आदित्य महाविद्यालयात 'फिट इंडिया' अभियानांतर्गत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात योगाभ्यासाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांकरिता योगाभ्यासाची प्रात्यक्षिकेही त्यांनी सादर केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन प्राचार्य डॉ.सतीश कचरे यांनी सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचे सर्वांना आवाहन केले. आपले जीवन आनंदीपणे व्यतीत करावयाचे असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात व्यायाम, ध्यान, खेळ, मनोरंजन, सामाजिक कार्यात सहभाग या सर्व बाबी महत्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य भूतडा यांनी 'फिट इंडिया' चळवळ ही भारतातील एक राष्ट्रव्यापी चळवळ असून त्यामुळे लोकांना शारीरिक व्यायाम व खेळ याकरिता प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन केले. तसेच या प्रसंगी 'फिट इंडिया' चळवळीचे उद्दिष्टे सांगून उपस्थित महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांना 'फिट इंडिया' शपथ प्राचार्य सानप यांनी दिली . या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी विविध देशी मनोरंजक खेळ व विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेच्या संचालिका डॉ. आदितीताई सारडा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभलं तसेच सर्व रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडला सदरील कार्यकमास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते
