अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मराठवाडा मुक्ती संग्राम कृतज्ञता रथयात्रेचे कळंब येथे स्वागत
देशभक्त न्युज - कळंब / -
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षा असून या निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश या विद्यार्थी संघटनेची 1 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम कृतज्ञता रथ यात्रा निघाली असून या रथ यात्रेचे दिनांक 2 सप्टेंबर रोजी कळंब येथे आगमन झाले या रथासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री नागेश गलांडे ,रथयात्रा प्रमुख सुरेश माटे ,लातूर विभाग संघटन मंत्री अजित केंद्रे, जिल्हा संयोजक तेजसिंह कोळगे हे आहेत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव कार्यक्रम समिती कळंब च्या वतीने मकरंद पाटील , शिवाजी गिड्डे, आनिल यादव ,दत्ता लांडगे, महादेव महाराज अडसूळ ,प्रकाश भडंगे, संदीप कोकाटे ,बंडू ताटे, महेश जोशी, निलेश पांचाळ, सचिन डोरले यांनी स्वागत केले व नगरपरिषद कार्यालयासमोरील हुतात्मा स्मतीस्तंभास पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले. यानंतर स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी गणपतराव कथले नगरपरिषद शाळा क्रमांक 1 येथे रथ पोहचल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका रेजा पायाळ यांनी रथ यात्रेचे स्वागत केले याप्रसंगी मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली यात्रेचा समारोप कार्यक्रम मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर रोजी सरस्वती भुवन महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
