Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त १७ ऑगस्ट ते १७ सप्टेबर या कालावधीत हुतात्मा स्तभाचे पुजन कार्यक्रम

 नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त १७ ऑगस्ट ते १७ सप्टेबर या कालावधीत हुतात्मा स्तभाचे पुजन कार्यक्रम 



माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या पुढाकारातुन राबतोय स्तुत्य उपक्रम 

देशभक्त न्युज - नळदुर्ग (सुहास येडगे)

मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी दि.१७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपुर्ण एक महिना हुतात्मा स्मरकातील हुतात्मा स्तंभाच्या पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला नळदुर्गकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या १८ दिवसात ६५० नागरीक व युवकांच्या उपस्थितीत शहरातील १८ गणेश मंडळ व १८ विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने हुतात्मा स्तंभाचे पुजन करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

      मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाचे २०२३ हे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक नळदुर्ग शहरात माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी दि.१७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपुर्ण एक महिना दररोज शहरात असणाऱ्या हुतात्मा स्मरकातील हुतात्मा स्तंभाच्या पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संपुर्ण मराठवाड्यात अशा प्रकारचा कार्यक्रम फक्त नळदुर्ग शहरातच होत आहे याचे सर्व श्रेय विनायक अहंकारी यांचे आहे. या कार्यक्रमास नागरीकांचा अतीशय चांगला व उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या १८ दिवसात ६५० नागरीकांच्या उपस्थितीत शहरांतील १८ गणेश मंडळ व १८ विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने हुतात्मा स्तंभाचे पुजन करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम दि.१७ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. सर्व धर्मीय व सर्व घटकांतील नागरीकांनी या स्तंभाचे पुजन केले आहे हे या कार्यक्रमाचे विशेष आहे.

         नळदुर्ग शहर पत्रकार संघ, नगरपालिका प्रशासन, पोलिस ठाणे, धर्मवीर संभाजी तरुण मंडळ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नळदुर्ग शहर, न्यु चैतन्य तरुण मंडळ, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,शिवशाही तरुण मंडळ, भोईराज तरुण मंडळ, महामार्ग पोलिस, नव चैतन्य तरुण मंडळ, भारत राष्ट्र समिती पक्ष, हुतात्मा बाबुराव बोरगावकर माध्यमिक शाळा साखर कारखाना, व्यापारी गणेश मंडळ, संत सेना महाराज नाभिक समाज संघटना, सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरीयल उर्दु शाळा, जि. प.प्रश्नाला मुलांची शाळा, मातंग समाज तरुण मंडळ, सांज कट्टा मित्रपरीवार,जय भवानी तरुण मंडळ, जय जवान जय किसान सामाजिक संघटना, जय हनुमान तरुण मंडळ शेतकरी संघर्ष समिती नळदुर्ग--अक्कलकोट, जय हिंद तरुण मंडळ व्यासनगर या मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्तंभाचे पुजन करून हुतात्म्यांना अभिवादन केले आहे. या कार्यक्रमामुळे शहरवासीयांमध्ये उत्साहाचे व देशप्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.