बावी येथे सकल मराठा बांधवा कडुन आरक्षण घोषणाबाजी व टायर पेटवून अंदोलकांवरील हल्ल्याच्या घटनेचा जाहीर निषेध
देशभक्त न्युज - वाशी अनिल धावारे / -
वाशी तालुक्यातील बावी येथे गावच्या वतीने अंतरली साराटी जिल्हा जालना गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण शांततेत सुरू असताना उपोषण स्थळी पोलिसांकडून उपोषण करते व गावकरी महिला. पुरुषावर. लाठी चार्ज करण्यात आला यांच्या निषेधार्थ बावी येथील सकल मराठा बांधवाांनी सोमवार दि.४ सप्टेबर रोजी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात एकत्र येवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून. गावातून घडलेल्या घटने बाबत निषेध फेरी काढण्यात आली यावेळी सरकारच्या दडपशाहीचा निषेध असो , एक मराठा लाख मराठा , जय जिजाऊ जय शिवराय , छत्रपती शिवाजी महाराज की जय , घोषणा देत बावी गावातून निषेध फेरी काढण्यात आली मुुुख्य रस्त्यावर टायर जाळुन घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला . हल्ल्यात जखमी झालेले पोलीस बांधवांबद्दल खंत व्यक्त करण्यात आली मराठा क्रांती मोर्चाच्या निषेध सभा .पोलिसांच्या विरोधात नसून सरकारच्या मनमानी दडपशाही विरोधात आहेत. यावेळी निषेध फेरी शांततेत पार पडली. तसेच सहभागी तरुण नागरिकांचे सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मराठा बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.
