हैदराबाद मुक्ती संग्रामातील देवधानोरा गावाचे योगदान अविस्मरणीय आहे - डॉ .सुरेश खुरसाळे
देशभक्त न्युज -कळंब - माधवसिंग राजपूत / -
हैदराबादचा संस्थानिक निजाम व रझाकार संघटनेने प्रजेवर हुकूमशाही व दडपशाही केली याला तितक्याच ताकदीने एकत्रित येत जनतेने विरोध केला व हुतात्म्या पत्करले हा देव धानोरा गावचा इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी व प्रत्यक्ष स्वातंत्र्य सैनिकाची भेट व्हावी म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने देव धानोरा ,गौर व धारूर या गावांना भेटी व अभ्यास दौरा आयोजित केला आहे प्रत्यक्ष स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकाकडून या लढ्याविषयी माहिती मिळाली हे आमचे भाग्य समजतो असे गौरव उद्गार योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे यांनी देव धानोरा येथे स्वातंत्र्यसैनिक व गावकरी यांच्यासमोर बोलत असताना व्यक्त केले योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृतीस्थळ निर्माण करण्यात येत आहे तसेच दिनांक 16 सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य सैनिकाचा मेळावा व 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी दिले याप्रसंगी त्यांनी पुढे बोलताना हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात लढला गेला हा संग्राम व पूज्य स्वामीजी यांच्या आठवणी कायमस्वरूपी जपल्या तर येणाऱ्या पिढ्यांना त्या अंशतः तरी अनुभवता येतील असे स्मारक योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई यांनी निर्माण करण्याचे कार्य हाती घेतली आहे स्मारकासाठी 60 × 45 फूट बांधकाम व प्रदर्शन साहित्य ,ग्रंथालय याचा समावेश असे सांगितले याप्रसंगी देव धानोरा गावकऱ्यांच्या वतीने योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश कुरसाळे ,कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, सचिव गणपत व्यास, कोषाध्यक्ष प्रा, माणिकराव लोमटे रमण देशपांडे प्राचार्य योगेश्वरी तंत्रनिकेतन, प्रा. शैलाजा बरुरे प्रा. डॉ. गणेश पिंगळे, प्रा. एस .पी. कुलकर्णी, प्रा.गणेश कदम , ए.ए. कलेढले डॉ. सागर कुलकर्णी यांचा सत्कार केला स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मणराव उर्फ बाबुराव बोंदर यांनी देव धानोरा गावचा संग्राम व यात 13 हुतात्म्यांचे झालेले बलिदान व जुलमी रझाकारांनी गावची केलेली जाळपोळ याविषयी माहिती दिली व लढ्यातील आठवणी सांगितल्या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रदेश सचिव डि.के. कुलकर्णी जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे ,बलभीम बोंदर
बाबासाहेब बोंदर ,माजी सरपंच लालासाहेब बोंदर,, चंद्रकांत बोंदर ,माधवसिंग राजपूत, बंकट बोंदर यांनी आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक दिनकर बोंदर, बळी कीर्ते, नारायण मिरगणे ,भालचंद्र वाटाणे, गंगाबाई गायकवाड, कमलबाई गायकवाड, यमुनाबाई बोंदर, काशीबाई बोंदर, द्रोपतीबाई भोसले, सीताबाई जाधव हे स्वातंत्र्य सैनिक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते हुतात्मा स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
