महाराष्ट्र शासनाचा क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार धाराशिव जिह्यातील बाळासाहेब चिवडे यांना जाहिर
शिवसेना नेते शंकरराव ( तात्या ) बोरकरांकडुन चिवडे यांच्या कर्तृत्वाचा सन्मान
देशभक्त न्युज - मुंबई / -
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२०२३ हा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यामधील शिक्षक बाळासाहेब मोहनराव चिवडे यांना नुकताच मिळाला असुन त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या स्काऊट क्षेत्रातील देण्यात आलेला हा महाराष्ट्रात प्रथम पुरष्कार मिळाल्या बद्दल शंकरराव ( तात्या ) बोरकर ( शिवसेना सहसंपर्क प्रमुख ) यांनी पुरस्कार प्राप्त बाळासाहेब चिवडे यांच्या कर्तृत्वाचा सम्मान करून त्यांचा शाल , श्रीफळ देऊन संत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
