जिल्हा परिषद ईटकूर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचा शिक्षक दिनी भव्य सन्मान सोहळा
मानापानाला भुकेलेल्या गाव पुढारी वर्गा समोर एका अपंग युवा उद्योजकाने कार्यक्रमाचे आयोजन करुन कर्तव्य जाणीवेचा विसर पडलेल्या समोर ठेवला आदर्श
देशभक्त न्युज - ईटकूर / -
कळंब तालुक्यातील ईटकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक व जिल्हा परिषद माध्यमिक या शाळेतील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार व सन्मान करून त्यांना यादिनी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष तथा अपंग युवा उद्योजक म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख आहे असे सचिन गंभीरे यांच्या पुढाकारातुन या भव्य कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
आपण ज्या शाळेत शिकलो , त्याच शाळेत देशाचे भवितव्य समजल्या जाणाऱ्या शालेय मुलांवर आई वडीलानंतर सर्वस्वी जवाबदारी स्विकारून सकाळी १० ते ४ या वेळेत ज्ञानदानाचे गावत येवून कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आपण गावचे नागरिक म्हणून शिक्षक दिनी सत्कार , सन्मान करणे गरजेचे आहे परंतु येथील गावपुढाऱ्यांना या गोष्टींचा विसर पडल्याचे संपन्न झालेल्या कार्यक्रमातुन दिसुन आले . एरवी मानापानाला भुकेलेल्या गाव पुढाऱ्यांना गंभीरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाने चपराक बसली असुन त्यांनी हा कार्यक्रम संपन्न करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे .
२६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी १० वर्गातुन शैक्षणिक गुणांची टक्केवारी घेवून उत्तीर्ण झालेल्यांसाठी प्रोहत्सानपर कांही शिक्षक प्रेमी वर्ग रोख स्वरूपात आर्थिक मदतीची बक्षिसे देतात ही बाब नक्कीच कौतुकास्पद व विद्यार्थी यांना प्रेरणादायी आहे .
परंतु या विद्यार्थ्यांना घडविण्याची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांच्याच शिक्षक दिनी पालक , गावकरी , गावपुढारी यांना विसर का पडावा हा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील मंडळीना पडला आहे . सध्यातरी ही उणीव गावचा सुजाण नागरिक म्हणून सचिन गंभीरे यांच्या माध्यमातुन भरून निघाली आहे .
संपन्न झालेल्या कार्यक्रमास ग्राप . सदस्य हनुमंत कस्पटे , ग्राप . सदस्य विनोद चव्हाण , पत्रकार अजित गायके , तुकाराम शिंदे , धनाजी पाटील , राहुल आडसूळ ,अभयसिंह आडसूळ ,वल्लभ पोते , श्रीकांत सावंत ,पुष्पराज शिंदे ,शाम कदम, लक्ष्मण गंभीरे , देसाई कोचिंग क्लसेस चे विजय देसाई , सुरेश लोंढे , सेवानिवृत्त शिक्षक एकशिंगे आदिंची यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित होती.
........................................................................................
गावचा नागरिक या शाळेचा विद्यार्थी आणि गावच्या मुलांना शालेय शिक्षणातुन घडविणऱ्या दिशादर्शक गुरूजनांचा शिक्षक दिनी सन्मान करून त्यांना पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा देणे हे एक पालक व गावचा सुजाण नागरिक म्हणून माझे कर्तव्य आहे ते मी पार पाडले .अशी प्रतिक्रया देशभक्तशी बोलताना सचिन गंभीरे - युवा उद्योजक तथा अध्यक्ष जिपकेंप्रा शाळा शालेय समिती ईटकूर यांनी दिली .

