कळंबची वृक्षलागवड राज्यासाठी प्रेरणादायी - संतोष राऊत
कळंब प्रतिनीधी -
शहर व परिसरात कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस व सकल कळंबकर यांच्या वतीने दिनांक पाच ऑगस्ट रोजी अकरा हजार एकशे अकरा झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तो संबंध राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मत कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संतोष राऊत यांनी कळंब येथील वृक्ष संवर्धन समितीस भेट दिली असता व्यक्त केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश, पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील, व्यापारी आनंद बलाई, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, संजय देवडा, परमेश्वर पालकर तांदुळवाडीचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व आयुक्त राऊत यांनी या चांगल्या उपक्रमांबद्दल एम रमेश व पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांचा सत्कार करून कौतुक केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की या उपक्रमाची निश्चितच राज्यभर दखल घेतली जाईल. वृक्ष हे शांतीचा संदेश देतात. कळंब हे शांत व शितल शहर म्हणून भविष्यात ओळखले जाईल असे उदगार काढले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात साफसफाई व खड्डे खोदकामाचे उद्घाटन केले. उपलब्ध झालेल्या वृक्षांची पहानी केली
वाढदिवसाचा खर्च टाळून वृक्षारोपणास मदत : -
यावेळी उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांची मुलगी डॉ प्रियंका बिक्कड हिचा रविवारी वाढदिवस होता. तो खर्च टाळून प्रियंका हिने आकराशे एक रूपये वृक्ष संवर्धन समितीस भेट दिले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
