Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पावसाळा संपत आला तरी नळदुर्गच्या किल्ल्यातील नेतृदीपक नर - मादी धबधबा प्रवाहित झाला नाही .

 पावसाळा संपत आला तरी नळदुर्गच्या किल्ल्यातील नेतृदीपक नर - मादी धबधबा प्रवाहित झाला नाही .

          



पर्यटकांनी किल्ल्याकडे पाठ फिरवील्याने. युनिटी मल्टीकॉन कंपनीला मोठा फटका 

देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनीधी / -

पावसाळा संपत आला तरी यावर्षी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नेत्रदीपक व पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा नर--मादी धबधबा अद्याप प्रवाहित झाला नसल्याने यावर्षी पर्यटकांनी नळदुर्गच्या किल्ल्याकडे पाठ फिरविली आहे. किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येत नसल्यामुळे याचा फटका युनिटी मल्टिकॉन्स कंपनीला बसला आहे.

       दरवर्षी पावसाळ्यात नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय व पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा "नर--मादी"धबधबा पुर्ण क्षमतेने प्रवाहित होतो.हा धबधबा सुरू झाल्यानंतर तो क्षण आपल्या डोळ्याने पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे आहे. नळदुर्ग शहराजवळील बोरी धरण पाण्याने १०० टक्के भरल्यानंतर या धरणाच्या सांडव्यातुन मोठ्याप्रमाणात पाणी वाहते. सांडव्यातुन वाहणारे हे पाणी पुढे बोरी नदीत मिसळते. बोरी नदी तुडुंब भरल्यानंतर नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांचे आकर्षण असणारा नर--मादी धबधबा ओसंडुन वाहण्यास सुरुवात होते. हा धबधबा ओसंडुन वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर हा नेत्रदीपक धबधबा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक या किल्ल्यात येतात. नर--मादी धबधबा ओसंडुन वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर ते पाहण्यासाठी किल्ल्यात १० लाखांपेक्षा जास्त पर्यटक हजेरी लावतात. किल्ल्यातील सर्वात आकर्षक व पर्यटकांना भुरळ घालणारा हा नर--मादी धबधबा आहे. मात्र यावर्षी पावसाळा संपत आला तरी नळदुर्ग शहर तसेच बोरी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसच झाला नाही. याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचबरोबर बोरीधरणाच्या पाणीपातळीत यावर्षी एक फुटही नवीन पाणी आले नाही. आज बोरी धरणांतील पाणीपातळीने अक्षरशा तळ गाठला आहे. बोरी धरण भरले नसल्याने बोरी नदीही आज पाण्याने भरलेली नाही. याचा परीणाम म्हणुन आज ऐतिहासिक किल्ल्यातील नर--मादी धबधबा प्रवाहित झाला नाही. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याचा आर्थिक फटका किल्ला भाडेतत्त्वावर घेतलेल्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीला बसला आहे. त्याचबरोबर पर्यटक येत नसल्याने किल्ल्यातील बोरी नदीत चालणाऱ्या बोटींग व्यवसायावरही याचा मोठा परीणाम झाला आहे.

      सध्याची पावसाची परीस्थिती पाहता येणाऱ्या काळात नर--मादी धबधबा सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे यावर्षी पर्यटकांना नर--मादी धबधबा प्रवाहित झाल्याचे पहावयास मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. किल्ला पाहण्यासाठी किल्ल्यात पर्यटक येत नसल्याने याचा फटका युनिटी मल्टिकॉन्स कंपनीबरोबरच किल्ल्यातील तसेच शहरांतील छोट्या व्यावसायिकांना मोठ्याप्रमाणात बसला आहे. पाऊस झाला नसल्याने खरीप हंगाम आज पुर्णपणे वाया गेला आहे त्यामुळे शेतकरी आज मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकरी सुखी तर सर्वजण सुखी अशी म्हण आहे. ती आज खरी ठरताना दिसुन येत आहे. आज बाजारात कुठेच गर्दी दिसुन येत नाही.

        किल्ल्यात पर्यटक येत नसल्याने याचा सर्वाधिक फटका युनिटी मल्टिकॉन्स कंपनीला बसला आहे. आज किल्ल्यात युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे सर्व कर्मचारी मिळुन जवळपास ८० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार अशाही कठीण परीस्थितीत युनिटी मल्टिकॉन्स कंपनी दर महिन्याला करत आहे.एकाही कर्मचाऱ्याला अद्याप युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने कामावरून कमी केले नाही. किल्ला पाहण्यासाठी शहरात पर्यटक आले तरच शहरांतील छोटे--मोठे व्यवसाय चालतात आज सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.