पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिना निमित्त धाराशिवात"सेवा पंधरवाडा" अंतर्गत कार्यक्रम
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
आज शनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी येथे आपल्या देशाचे कर्तव्यनिष्ठ प्रधानसेवक "नरेंद्रभाई मोदी" यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने "सर्वश्रेष्ठ दान-रक्तदान" कार्यक्रम धाराशिव ग्रामीण मंडळात धाराशिव भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आले ,याप्रसंगी लासोना ग्रामस्थ मधील असंख्य युवकांनी सहभाग नोंदवाला, यावेळी ५७ रक्तदात्याने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, मा. जिल्हापरिषद अध्यक्ष नेताजी पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, दत्ता देशमुख, सरपंच संगमेश्वर स्वामी, हिम्मत भोसले, प्रसाद मुंडे, श्रीमंत पाटील, शरदराव यादव, जोतिराम काटे, (पोलिस पाटील), संजय पवार, प्रशांत यादव, आण्णासाहेब पाटील, सुभाष नाईकनवरे, जयराम पाटील, योगेश सावंत (अध्यक्ष), राजेश यादव (उपाध्यक्ष) यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, युवक उपस्थित होते.
