धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडीच्या शिक्षक आणि विद्यार्थीनीला थेट पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे शुभेच्छा पत्र प्राप्त
आ . राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडुनही "परिक्षा पे चर्चा " शुभेच्छा संदेश प्राप्त सर्वांचे अभिनंदण
दै . सा . देशभक्त वृत्तपत्राचे संपादक लक्ष्मण ( तात्या ) शिंदे - पाटील यांचे मित्र जेष्ठ पत्रकार अविनाश ( मामा ) गायकवाड - पाटील यांची कु . वैष्णवी ही कन्या असुन देशभक्त परिवाराकडुन कु . वैष्णवीला शुभेच्छा
देशभक्त न्युज - तुळजापुर प्रतिनिधी / -
सरस्वती विद्यालय, तामलवाडी येथील एस.एस.पाटील सरांनी ‘परीक्षा पे चर्चा‘ या कार्यक्रमात सहभाग घेऊन कौशल्य आधारित विषयानुसार निबंध लिहून आपले विचार मांडले.
त्याचप्रमाणे शाळेतील इयत्ता १० वी ची विद्यार्थीनी कु.वैष्णवी अविनाश गायकवाड हिने ‘परीक्षा पे चर्चा‘ या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले विचार मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वाक्षरीचे शुभेच्छा संदेश देणारे पत्र तिला प्राप्त झाले आहे. तसेच पिंपळा बुद्रुकचे जयेश (वरद), जोतिबा जाधव यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल त्यांनाही शुभेच्छापत्र प्राप्त झाले आहे.
पंतप्रधानांचे शुभेच्छा पत्र प्राप्त झाल्याबद्दल कु.वैष्णवी हिचे अभिनंदन करून शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. कु.वैष्णवी ही ज्येष्ठ पत्रकार अविनाश गायकवाड यांची कन्या आहे. तिचे प्राथमिक शिक्षण तामलवाडी येथील सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये झाले. सध्या माध्यमिक शिक्षण ती सरस्वती विद्यालयात घेत आहे.

