बसवराज मंगरूळे यांची माकणी येथीलं अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थिती .
देशभक्त न्युज - लोहारा प्रतिनिधी / -
माकणी येथे ह.भ.प संत शिरोमनी मारुती महाराज माकणीकर यांच्या 27 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या चरणास बसवराज मंगरुळे यानी उपस्थििती लावली असता यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला ह.भ . प. महेश महाराज यांच्या काल्याचे किर्तन व गुरुवर्य ह.भ.प विठ्ठल दादा वासकर यांच्या प्रवचनाचा लाभ घेतला, यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार,आमदार ज्ञाणराज चौगुले, भाजपा जिल्हाध्यक्ष धाराशिव संताजी चालुक्य,युवानेते किरण गायकवाड, राहुल पाटील सास्तुरकर, यांचीही प्रमुख उपस्थिती होती . यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते .
काल्याचे किर्तन समाप्ती नंतर सर्वांनीच पंक्तीत बसुन सर्वांसोबत महाप्रसाद घेतला .
