बीड येथील आदित्य कृषी महाविद्यालयाचा अटकेपार झेंडा
बिहार कृषी महाविद्यालयात ‘आदित्य’च्या विद्यार्थ्याची सहाय्यक प्राधापक म्हणून निवड
देशभक्त न्युज - बीड प्रतिनिधी / -
बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना घडवणारी संस्था म्हणून नावारुपाला आलेली आहे. येथील अनेक विद्यार्थी मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत. नुकतीच आदित्य कृषी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने पुन्हा यशाची पताका फडकवली आहे. त्याची बिहार मधील कृषी महाविद्यालय सागोर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. आदित्य सारडा, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्य तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ.गौरव उत्तमराव कराड बिहार मधील कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून निवड झालेल्या विद्याथ्याचे नाव आहे. डॉ.गौरव कराड यांनी आदित्य कृषी महाविद्यालयात सन 2010 साली पदवी घेतली आहे. त्याच बरोबर गौरव कराड यांनी पुढील शिक्षण एम. एससी. (कृषी) 2013 मृदा विज्ञान जुनागड कृषी विद्यापीठ, जुनागड गुजरात, पी. एच. डी. ( कृषी) 2016 आणंद कृषी विद्यापीठ गुजरात, एस.आर. एफ. - 2016 - 2018 भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली तदनंतर रिसर्च असोसिएट - 2018 - 2022 भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, शिक्षण सहयोगी -म्हणून 2023 मध्ये शासकीय कृषी महाविद्यालय बदनापूर, अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे काम पहिले . डॉ गौरव कराड म्हणतात की आदित्य शिक्षण संस्थेत सर्व गुरुजणांकडून ज्ञानार्जनाबरोबर सामाजीक जिवन जगण्याची मिळालेली शिदोरी मला इथपर्यंत घेवून आली. बीडच्या आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत असल्यामुळे तेथील विद्यार्थी पुढे जावून चांगल्या पदावर दिसतात. असेही यावेळी कराड म्हणाले. डॉ.गौरव कराड यांची बिहार मधील कृषी महाविद्यालय सागोर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाल्याची माहिती आदित्य महाविद्यालयाचे प्रचार्य शाम भुतडा सर यांनी दिली. या यशाबद्दल गौरव कराड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
