Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आ . राणाजगजितसिंह पाटील यांनी पालावरच्या मुलांसोबत केली दिवाळी साजरी

 आ . राणाजगजितसिंह पाटील यांनी पालावरच्या मुलांसोबत केली दिवाळी साजरी 

 " आ . राणा पाटील या वाघाचा नादच खुळा , साऱ्या पुढार्‍यांच्या निराळा " पालावरील मुलांना कपडे , वाजविण्याचे फटाके , दिवाळी  साहित्य देवून अपुलकीच्या नात्याचे कर्तव्यातुन घडविले दर्शन .





देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनीधी / -

आ . राणाजगजितसिंह पाटील यांनी

पालावरच्या मुलांसोबत केली दिवाळी साजरी केलेली ही दिवाळी अविस्मरणीयच मनातून होणारा आनंद, मुलांचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, खरेदी करतानाचा हर्ष.. सारे कांही अवर्णनीय हा अनुभव प्रत्येकाने घेऊन पहावा असाच आहे.

सांजा बायपास रोडवर पालावर काही कुटुंबे वास्तव करत आहेत. या ठिकाणच्या मुलांना धाराशिव शहरात आणून मोठ्या आनंदात या सर्व मुलांशी गप्पा गोष्टी केल्या आणि दिवाळीच्या आत्मिक आनंदोत्सवास सुरुवात झाली.

शहरातील जवाहर ड्रेसेसमधून या सगळ्या मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे घेण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची मागणी या मुलांनी केल्यानंतर त्यांच्या सोबत जाऊन फटाक्यांच्या दुकानातून त्यांना जे हवे ते फटाके घेऊन दिले.

आपल्या गाडीत या सर्व मुलांना घेऊन फेरफटकाही मारला. त्यानंतर पालावरील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांसमवेत फराळाचे वाटप केले. 

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो. त्यामुळे या परिस्थितीत वाढदिवसाच्या निमित्ताने देखील आपण सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. 

सर्वांनी दिवाळीच्या या आनंददायी पर्वाच्या निमित्ताने समाजातील वंचित, गरजू घटकांना आपापल्या परीने सर्वांनी जमेल ते सहकार्य करून दिवाळी साजरी करावी असे आवाहन करतो.

यावेळी युवा नेते मल्हारदादा पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, राहुल काकडे, संदीप इंगळे, प्रवीण शिरसाट, राहुल शिंदे, मनोज देशमुख, गणेश एडके, सागर दंडनाईक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.