एक फरडा वक्ता ते अभिनेता भाई बाबुराव उर्फ आण्णा काळाच्या पडद्याआड
बाबुराव उर्फ सखाराम महादेव जाधव तथा सर्वत्र भाई याच नावाने परिचीत असणारे ,शे.का.पक्षाचे जेष्ठ नेते ,हरहुन्नरी कलाकार,परखड वक्ते,शात्रोक्त पेटी वादक,रामायनाचार्य,वाचक,सुचक,असे विविध अंगानी परीपुर्न असलेले व्यक़्ती.महणजे अदरनीय भाई "बाबुराव जाधव"म्हणंजेच सर्वांचे *अंण्णा*
अंण्णानी,ईटकुर गावाची ओळख पुर्न महाराष्ट्रात करुन दिली ,ती म्हणंजे शे.का.पक्षाचे.जेष्ठ नेते एन्.डी.पाटील यांच्या खांद्याला खांदा लाऊन केलेले शे. का.पक्षाचे कार्य.
त्यांची ओळखचं पडलेली होती.,,ईटकुरचे जाधव अंण्णा म्हणुन.आणी खरोखरच अंण्णानी,ती ओळख पक्षाशी एकनिष्ठ राहुन जीवनाच्या शेवट पर्यंत पाळली,त्यात कुठलीही बाधा आनली नाही,हे विषेश.अंण्णानी शेवट पर्यंत लालबावटा जो खांद्यावर घेतला ,त्या लालबावट्यातचं अखेरचा स्वास घेतला.
अंण्णाची खाशियत,रुबाबदारपना ,म्हणंजे त्यांच्या पिळदार मिशा.तसच त्यांच काटक शरीर.वयाची श्याहात्तर वर्षे सरली होती तरी .शरीरानं थोडीही आपली साथ सोडली नव्हती, की कुठे पाठीचा कणा वाकला नवहता,कि कधी हातात काठी घेतली नव्हती.
यालाही भाग्य लागतं.
अंण्णाना एका कलेची आवड नव्हती ,तर ते अनेक कलेत पारंगत होते.ऊत्तमं हार्मोनियम वादक होते.स्पष्ट वक्ते होते.
त्यांनी काही काळ सुश्राव्य रामायनाचे कार्यकृमही केले.
त्यांनी अनेक सांसकृतीक कार्यकृमात हीरीरीने भाग घेऊन त्याचे सुत्रसंचालनाचे कामही पारपाडीत.अंण्णाना अभिनयाचीही अतीशय आवड होती.तिही त्यांनी युटुबच्या माध्यमातुन ,,ऊसातली भांनगड,नायंटी एम एल .या वेबसिरीजच्या माध्यमातुन पुर्ण करुन घेतली.त्यांची एक
खाशियत सांगायची झाली तर,ती म्हणंजे सर्व वयोगटातील लहान थोर यांच्याशी आसलेली मैत्री .तसेच सर्व समाजातील असलेलं त्याचं नातं,प्रेम. हे ही जमेची बाजु होती.
आंण्णानी यवडं राजकारन शेवट पर्यंत केलं,त्यांच्या मंत्र्या पर्यतं ओळखी होत्या.मोठमोठ्या अधीकाऱ्याचे संमध होते .परंतू च्यांचा कधीही आपल्या स्वार्थासाठी वापर करुन घेतला नाही की,त्यांचा कधी फायदा घेतला नाही.किंवा काळे धन कमावन्याची अभिलाशा धरली नाही .ही त्यांची जमेची बाजू अभिमानानं सांगावी लागेल .अभिनयातहीअंण्णानी ठसा ऊमटवला ,आपलीखलनायकि दाखवली .ती कुणाला पसंत पडली तर कुणाला नाही.परंतू कुठल्याही टिकेला सामोरी जाण्याची त्यांची तयारी होती.त्यानी दाखऊन दिलं,कि कलेला वय नस्त ,कलेला जात नस्ते,किंवा कलेला शिमा नस्तात,आणि कलेला मर्यादा ही नस्तात.
माझ्या आणि त्यांच्या वयात तीस पस्तीस वर्षाचं अंतर,पण कलेला वय नस्तं आणी कलेला मर्यादा नस्तात.म्हनुन आमची अलीकडच्या काळात मेत्री जमली होती.
असे अष्टपैलु व्यक्तीमत्व त्यांच्या कार्याचा ठसा मागे ठेऊन , आज आपल्यातुन नीघुन गेलेले आहे. त्यांच्या आठवणी ,त्यांच कार्य ,आपल्या जीवणात अंनत काळ टिकुन राहील यात शंकाच नाही .
त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.तो पेलण्याची ताकत देव त्यांना देओ, तसेच च्यांच्या अत्म्यास शांती लाभो.ही ईश्वर चरनी प्रार्थना करने एवडेच आपल्या हाती आहे.
हीचं. शब्द सुमनानी वाहीलेली अंण्णाना सा . दै . देशभक्त परिवारा कडुन श्रद्धांजली .
-: भावपूर्ण श्रद्धांजली शब्दांकन : -
हरिश्चंद्र गजानन कुलकर्णी ईटकूर
