आदित्य कृषी महाविद्यालय मध्ये आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन
देशभक्त न्युज - बीड l प्रतिनीधी / -
आदित्य शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबतच सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यापीठाच्या विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवतो अशातच आदित्य कृषी व संलग्न महाविद्यालय बीड यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन बीड येथील आदित्य कृषी महाविद्यालयात दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कचरे यांनी दिली.
सदरील आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्य डॉ. आदिती ताई सारडा , प्रमुख अतिथी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.एस एस मोरे तसेच बीड जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख उपस्थित राहणार आहेत. सदरील स्पर्धेसाठी मराठवाड्यातील विविध कृषी व संलग्न महाविद्यालयाचे संघ सहभागी होणार आहेत. सदरील स्पर्धा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षक अधिकारी डॉ आशा देशमुख,डी एफ राठोड , शाहू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. मराठवाड्यातील येणाऱ्या सर्व संघाचे आदित्य शिक्षण संस्थेमध्ये सर्व सोयी सुविधेने स्वागत करण्यात येत आहे, सदरील स्पर्धेसाठी आदित्य कृषी, कृषी अभियांत्रिकी ,अन्नतंत्र, व जैवतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या उत्साहात सदरील कार्यक्रम ची तयारी करत आहेत. सदरील स्पर्धेसाठी मराठवाड्यातील एकूण 40 संघ सहभागी होतील अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांनी दिली
