Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संगणकाच्या युगात गावगाथा दिवाळी अंकांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न कौतुकास्पद : आमदार रवींद्र धंगेकर

 संगणकाच्या युगात गावगाथा दिवाळी अंकांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न कौतुकास्पद : आमदार रवींद्र धंगेकर




देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनीधी / - 

सध्याच्या धकाधकीच्या धावपळीमुळे आपणं आपली ग्रामीण संस्कृती रूढी परंपरा विसरत चाललो असताना संगणकाच्या युगात गावगाथा दिवाळी अंकांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.अतिशय चांगले गावगाथा अंक झाला आहे.ग्रामीण साहित्य व जुन्या परंपरा अजूनही ग्रामीण भागात पाळले जातात गावगथा अंकांत नावाप्रमाणे प्रत्येक गावखेडयाची गाथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही अनेक परंपरा महाराष्ट्रातील अनेक गावात पाळल्या जातात त्यांचं उल्लेख या पुढच्या गावगाथा दिवाळी अंकात व्हावे हिच अपेक्षा आहे.

      गावगाथा दिवाळी अंकाचे दुसरे वर्ष असून महाराष्ट्रातील खासकरून शहरी भागातील वाचक प्रतिसाद देत आहेत.हटके विषय असल्याने वाचकांना अंक आवडतं आहे.यंदाच्या वर्षी गावगाथा नावाला शोभणारी मुखपृष्ठ लाभले आहे.

     यावेळी महेश गिते, सोमेश्वर वाडी,दत्ता नंदे व गावगाथा चे धोंडपा नंदे उपस्थित होते. ग्रामीण भागातील संस्कृती लोप पावत असताना त्याला ऊर्जा देण्याचं काम गावगाथा केल आहे, आता हा गावगाथा अंक सर्वत्र उपलब्ध असुन वाचक प्रेमी नी आवर्जून वाचावं असे आवाहन आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी केल आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.