Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भूम येथील विविध विकास कामांचे पालकमंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते भुमिपुजन संपन्न

 भूम येथील विविध विकास कामांचे पालकमंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते भूमिपुजन संपन्न 


पालकमंत्री सावंतानी काय विकास केला मा .आ . राहुल मोटेंचा पत्रकार परिषदेतून प्रश्न  तर 

"तुझ्या गावात माझं पाणी हेतं "मा . आ . मोटेंच्या प्रश्नाला नाव न घेता पालकमंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत यांचे सडेतोड उत्तर  


देशभक्त न्युज भूम प्रतिनिधी / -




"तुझ्या गावात माझं पाणी होतं'" असे पत्रकार परिषदेतुन विचारल्या गेलेल्या प्रश्नाला सडेतोड प्रतिउत्तर महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव न घेता मागील काही दिवसापूर्वी त्यांनी भूम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा . डॉ .तानाजीराव सावंत यांच्यावर विकास काय केला असा प्रश्न उपस्थित केला होता .या प्रश्नाला त्यांनी भूम येथील नगरपालिका व ग्रामीण अंतर्गत रस्ते आदि विविध विकास 

कामांच्या भूमिपूजन उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उत्तर दिले .

भुम नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामाची भूमिपूजन , उद्घाटन व लोकार्पण सोहळा दिनांक 21 रोजी दुपारी पालकमंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले यावेळी मंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत बोलत होते पुढे बोलताना ते असेही म्हणाले की , 25 वर्षाच्या इतिहासात सत्ता तुमच्याच बाप दादाची होती तुम्ही विकास काय केला ,स्वतः च्या गुत्तेदारीसाठी कामे केलीत असाही आरोप त्यांनी केला व विकास काय असतो हे आम्ही 2016 पासून आपल्या मतदारसंघात नव्हे तर धाराशिव जिल्ह्यात दाखवून देण्याचे काम मी केले आहे असेही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले तर उजनीच्या पाण्या संदर्भात बोलताना स म्हणाले की , मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे माझ्या भागामध्ये रस्ते नसले तरी चालतील, दवाखाने नाही झाले तरी चालतील परंतु माझ्या शेतकरी बांधवांना कणखर होण्यासाठी मिळणारे जिल्ह्याचे हक्काचं 23 टीएमसी पाणी जिल्ह्याला मिळवणार तोच खरा माझा विकास असणार आहे हे मी पुन्हा आपणा सर्वांना सांगत आहे येत्या फेब्रुवारीमध्ये निश्चितपणाने भूमकरांना उजनीच्या पाण्याबाबत कामकाज दाखवण्यासाठी घेऊन जाणार असं ल्याचेही त्यांनी सांगितले .

2019 चे तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले की , तत्कालीन मुख्यमंत्र्यांना वाटत होते मी काहीतरी गडबड करीन तसंच झालं त्यांच्या तोंडात साखर पाडली आणि आम्ही नूतन सरकार स्थापन केलं आणि ते आज तुमच्या सेवेसाठी कामे करण्यासाठी घरबाहेर पडताना दिसत आहेत . असाही टोला सावंतांनी यावेळी लगावला .

या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ संयोगिता गाढवे यांनी भूमकरांच्या वेदना लक्षात घेत भूम तालुक्यासाठी भूम येथे सिटीस्कॅन व डायलिसिस चे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली असता तानाजी सावंत यांनी एका महिन्या डायलिसिस ची यंत्रणा चालू करून देण्यात येईल तर सिटीस्कॅन साठी थोडा अवधी लागेल असे सांगत मार्च महिन्यापर्यंत तेही दिले जाईल असा शब्द दिला माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी भूम तालुका कृषी बाजार समितीसाठी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणूक हेळसांड पाहता मंत्री महोदयाच्या माध्यमातून भूम बाजार समितीला मोठाले धान्य खरेदी करणारे व्यापारी मिळवून द्यावे व बाजार समितीला रंग रूप विकासाच्या माध्यमातून करून द्यावा अशी मागणी करत भूम नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी फंडाची मागणी केली यावेळी नामदार तानाजी सावंत यांनी 46.84 कोटीची पाणीपुरवठ्याला प्राधान्याने मंजुरी देण्यचा शब्द दिला.

या उद्घाटन समारंभ साठी व भूम नगरीच्या वतीने मंत्री महोदय यांचा 25 जेसीबीच्या साह्याने पुष्प वर्षा करून नागरी सत्कार करण्यात आला यामध्ये कोष्टी समाज, सकल मराठा समाज , ब्राह्मण समाज, मुस्लिम समाज, वडार समाज ,ढोर समाज, लिंगायत समाज, बौद्ध समाज ,मातंग समाज, पारधी समाज, नाभिक समाज , माळी समाज सुतार समाज ,रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, रथ गल्ली व भजनी मंडळ यांच्या वतीने पालकमंत्री महोदय यांनी भूम तालुक्याला भरभरून निधी दिल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी चांदवड ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते बराणपुर सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्यांचा व भूमचे माजी उप नगराध्यक्ष बबन साठे यांच्यासह अनेकांनी पालकमंत्री सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत केला जाहीर प्रवेश .

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत , माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे , माजी नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर , माजी जि प सदस्य दत्ता आण्णा साळुंखे , अण्णासाहेब देशमुख ,दत्ता बापू मोहिते ,गौतम लटके सर ,बिबीशन अण्णा खामकर, उद्धव साळवे, दत्ता गायकवाड ,रामकिसन गव्हाणे,माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी , नितीन चेडे , तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश शेळवणे , उपसभापती गोफणे , शिवसेनेचे युवराज हूंबे ,युवा नेते साहिल आप्पा गाढवे ,संजय नाना गाढवे फाउंडेशनचे सुरज गाढवे ,बाळासाहेब अंधारे , अण्णा जाधव ,शिवाजी जाधव, बालाजी माळी, बाळासाहेब सुर्वे , रईसभाई काजी , उद्योगपती संजय साबळे सह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते भूम शहरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.