३२ वर्ष परिचर पदी प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त बबन ब्रम्हराक्षस यांना महाविद्यातया कडुन सम्मान पूर्वक निरोप
देशभक्त न्युज - परंडा । प्रतिनिधी ( फारुक शेख)
परंडा येथे दि. ३१ जाने . २०२४ रोजी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अंतर्गत शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे . शिंदे महाविद्यालयातील परिचर बबन अक्काजी ब्रम्हराक्षस हे ३२ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत . त्यांचा संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने सेवागौरव करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुनिल जाधव उपस्थित होते . तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख आणि सत्कारमुर्ती बबन ब्रम्हराक्षस सौ संगिता ब्रम्हराक्षस आणि मुलगा अनिकेत ब्रम्हराक्षस उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते . यावेळी ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख डॉ गजेंद्र रंदिल डॉ विद्याधर नलवडे प्रा बी डी माने प्रा संभाजी धनवे प्रा उत्तम कोकाटे प्रा किरण देशमुख यांनी आपली मनोगते व्यक्त केली . प्राचार्य डॉ सुनिल जाधव यांनी अध्यक्षीय समारोप केला . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा डॉ सचिन चव्हाण यांनी मानले . कार्यक्रमासाठी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते .
