Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षणाचा जल्लोष पानगावतही आनंदोस्तवाने दुमदुमला

 

सायंकाळी गावातील सर्वजाती धर्माच्या लहान ,तरुण , वयोवृद्ध मंडळींनी ग्रामपंचायत समोर एकत्रित येवून हलगी , लेझीम च्या ठेक्यात मराठा आरक्षणाचा केला आनंद साजरा .


सरपंच मनिषा शेखर ओव्हाळ , उपसरपंच शिवाजी बेडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन .


मराठाक्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या गनिमीकावा व मराठा समाजाची एकजुट यामुळेच महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घेणे भाग पडले - संपादक लक्ष्मण शिंदे 


गुलालाची उधळण तरुणासह , वृद्ध मंडळींनी हलगीवर ठेका धरून लेझीम खेळत महापुरुषांच्या घोषणासह मराठा क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विजयी नावाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.







देशभक्त न्युज - पानवाव प्रतिनीधी

मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या गनिमी काव्यापुढे महाराष्ट्र सरकारने नमते घेत अखेर शेवटी दि . २७ जानेवारी रोजी मराठा आरक्षणाची घोषणा करून मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कुच केलेलेल्या असंख्य मराठा बाधवांच्या मागण्या मान्य करून त्यांना मुंबई आजाद मैदानावर करण्यात येणाऱ्या अंदोलनापासून मुक्त केले .

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा केल्याने महाराष्ट्रात मराठा समाज बांधवांसह इतर समाज बांधवांनीही शहरी भागासह खेडोपाडी गुलालाची उधळण करीत डीजे , लेझीम आदि वाद्याच्या तालावर ठेका धरून , ऐकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा देत मराठा आरक्षणाचा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला .

याचाच एक भाग म्हणून कळंब तालुक्यातील मौजे पानगाव येथील लहान , तरुण , व योवृद्ध मंडळींनी ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात 

एकत्रित येवून फटाक्यांची अतीषबाजी हलगी च्या ठेक्यावर लेझीम खेळत घोषणा देत आनंद साजरा केला .

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच मनिषा शेखर ओव्हाळ , उपसरपंच शिवाजी बेडके यांनी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले .

यावेळी भिमराव पवार , मेजर वसंत ओव्हाळ , मेजर मोहनराव ओव्हाळ , मेजर हरिचंद्र बेडके , विलास पवार , श्रीकृष्ण पवार , आण्णा बेडके , राजाभाऊ चव्हाण , परसराम कदम , वसंत पवार , प्रभु ओव्हाळ , दिपक ओव्हाळ , पोपट ओव्हाळ , किशोर ओव्हाळ , शेखर ओव्हाळ , राजकुमार वाघमारे दै . सा . देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती . तर पानगावातील सर्व धर्माच्या लहान ,थोर , तरुण मंडळींनी या अनंदोत्सवात सहभाग नोंदवून मिळालेल्या मराठा आरक्षणाचा आनंद साजरा केला .

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मेजर मोहन ओव्हाळ यांनी केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.