महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या जुन २०२४ मधील परिक्षेत भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवित यश
देशभक्त न्युज - कळंब । प्रतिनिधी
डी.एल.एड्.वार्षिक परीक्षेत भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यामध्ये प्रथम वर्षाला एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी २१ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले तर २७ विद्यार्थी हे एटीकेटीसह उत्तीर्ण झाले तसेच द्वितीय वर्षात एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट त्यापैकी ३७ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यसह व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
डी.एल.एड्.प्रथम वर्षातून हुके स्वप्नाली नारायण यांनी ८३.३० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक,जगताप तेजस्विनी बाळासाहेब यांनी ८१.१० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर सोनवणे रूपाली दामोदर यांनी ८०.३० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला तर डी.एल.एड्. द्वितीय वर्षातील चोरघडे सीमा भिकाजी यांनी ८३.०० टक्के गुण मिळवून प्रथम,कोरे बालाजी पांडुरंग यांनी ८०.९० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक रितापुरे साक्षी रामहरी यांनी ८०.२०टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,डायट अधिव्याख्याता व भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे संपर्कप्रमुख डॉ.गजेंद्र जमादार,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,अध्यापकाचार्य श्रीकांत पवार,अविनाश घोडके व मोहिनी शिंदे यांनी अभिनंदन व कौतुक केले.