Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जनतेच्या आग्रहामुळे उमरगा - लोहारा विधानसभा लढण्याचा कैलास शिंदेचा निर्धार…!

भाजपने उमेद्वारी न दिल्यास भाजपा  जिल्हाउपाध्यक्ष शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली घोषणा 

 देशभक्त न्युज - उमरगा प्रतिनिधी / - 

उमरगा - लोहारा तालुक्यात मागील 25 वर्षापासुन  राजकारणापेक्षा  समाजकारणातुन मी येथील नागरीकांत माझ्या कर्तृत्वाचा एक अगळा वेगळा ठसा उमटविला असुन त्यामुळे सर्वसामान्यां सोबत माझे अपुलकीचे व जवळकीतेचे नाते निर्माण झाले असल्यामुळे  येथील जनसामान्यासह सर्वसामान्य जनतेची मी उमरगा - लोहारा विधानसभा लढवावी अशी इच्छा असल्याने मी भाजपाकडून ही निवडणूक लढणार असुन पक्षाने उमेद्वारी न दिल्यास जनतेच्या पाठींब्यावर मी ही निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचा निर्धार भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष तथा माजी . जिप सदस्य , धाराशिव डिसीसी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन कैलास चिंतामणराव शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन केला .  

त्यांनी यापूर्वी एक वेळेस उमरगा - लोहारा विधानसभा निवडणूकही लढवली होती .मात्र  कार्यकर्ते , समर्थक व जनतेच्या आग्रहाखातर यावेळीही उमरगा- लोहारा विधानसभेची निवडणूक भाजपा पक्षाकडुन लढणार असुन वेळप्रसंगी पक्षाकडून उमेद्वावारी न मिळाल्यास ही अगामी निवडणूक मी अपक्ष लढविणार असल्याचे त्यांनी  दि .२४ रोजी उमरगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले .



                 
                  जनसामान्यातल नेतृत्व 

येथील शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना  शिंदे म्हणाले की ,गेली २५ वर्षापासुन मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात तन , मन , धनाने प्रमाणिक पणे काम रात्रंदिवस येथील जनतेची प्रधान्याने कामे करत आलो असुन मी ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण करून सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे . जिल्हा परिषद सदस्य असताना तालुक्यात अनेक मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार बांधकामासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांचा मी ही निवडणून लढवावी म्हणून त्यांचा रेटा वाढत असल्यामुळे ही निवडणूक लढविण्याचा माझा माणस आहे . मुस्लिम समाजातील अनेक लोकांनी येऊन मला पाठिंबा जाहीर केला आहे . भाजपा पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार आहे पण उमेदवारी न मिळाल्यास वेळप्रसंगी जनतेचा सेवक म्हणून अपक्ष निवडणूक  लढण्यास मी तयार आहे . २०१४ साली मी ही विधानसभा निवडणूक लढवली होती .त्यात थोडक्या मताने माझा पराभव झाला होता . त्यानंतर सातत्याने अनेक वर्ष जनतेत मिसळु त्यांची कामे करीतच आलो आहे . गेल्या दोन महिन्यापासून माझ्या तालुक्यात भेटीसाठी सुरू आहेत यात मी सदरील विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची मनोमन भावना असुन त्यांचा यासाठी  वाढता पाठिंबा व प्रतिसाद मिळत आहे . ही निवडणुक आता जनतेनीच हातात घेतली असल्याचे त्यांच्या माझ्याशी झालेल्या चर्चेतुन दिसुन येत आहे .

तालुक्याचा विकास झाला असे काहीजण सांगत असले तरी तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत राष्ट्रीय महामार्ग, एमआयडीसी , बेरोजगारी, गुन्हेगारी,पाण्याचा प्रश्न असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की अजूनही दररोज सर्वसामान्यांची छोटी मोठी कामे करत आलो आहे . जनतेशी माझी नाळ जोडलेली असुन त्यांच्याशी माझे एक अपुलकीचे व कौटुबीक जवळीकतेचे नाते निर्माण झाले आहे  . याचा मला ही निवडणूक विजयी होण्यासाठी नक्कीच मोठा फायदा होणार असल्याचा ठाम आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.