राज्यामध्ये महायुतीसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष महायुतीच्या खांद्याला खांदा लावून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांचे आदेशानुसार गेल्या पंधरा वर्षांपासून काम करत आहे, त्यामुळे अगमी विधानसभेसाठी रिपाई ( आ . ) गटास किमान दहा ते बारा जागा देण्याची ठरावाद्वारे मागणी करण्यात येत आहे.
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / -
परंडा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, पक्षाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली परंडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे समवेत महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकी संधर्भात विचारविनिमय करण्यासाठी बैठक पार पडली, राज्यामध्ये महायुतीसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष महा युतीचे खांद्याला खांदा लावून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. रामदासजी आठवले यांचे आदेशानुसार गेल्या पंधरा वर्षांपासून काम करत आहे, महाराष्ट्रात आठवले साहेबांना माननारा मोठा वर्ग आहे, असे असतानाही रिपब्लिकन कार्यकर्ते यांना कुठल्याही महामंडळावर नियुक्ती केली नाही, तसेच विधानसभेचे जाहीर झालेल्या निवडणुकीत घटक पक्ष म्हणून अद्याप जागा दिलेल्या नाहीत याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करून येत्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटास एकंदरीत दहा ते बारा जागा देण्यात याव्यात अशी एकमुखी ठरावा व्दारे मागणी करण्यात आली,,
यावेळी उपस्थित परंडा तालुका अध्यक्ष उत्तम ओव्हाळ ,सोशल मीडिया आयटी सेल जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे ,तालुका संपर्क दादा सरवदे ,तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे , दीपक ठोसर , बाबा गायकवाड , हरिभाऊ अडाळे , साजिवन भोसले , भास्कर ओव्हाळ , बापू हावळे , शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
